वळसे पाटलांच्या विजयासाठी काम करणार; व्यापारी महासंघासह अनेकांचा एकमुखी पाठिंबा

  • Written By: Published:
वळसे पाटलांच्या विजयासाठी काम करणार; व्यापारी महासंघासह अनेकांचा एकमुखी पाठिंबा

मंचर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही व्यापारी महासंघ, रोटरी क्लब व घोडेगाव बार असोसिएशन या संघटनांनी एकमताने दिली आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात बैठकीत संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी कार्यक्रमात पूर्वा वळसे पाटील यांनी वळसे पाटील यांनी केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही

मंचर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भक्कम निधी

वळसे पाटील हे मंचर शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, त्यासाठी 85 कोटी व पाणी योजनेसाठी 135 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढे मंचर शहर स्वच्छ सुंदर व्हावे, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्दही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात

वळसे पाटलांना निवडून आणण्यासाठीच काम करणार

वळसे पाटील यांनी सतत रोटरी क्लब, घोडेगाव बार असोसिएशन आणि व्यापारी यांना मदतीचा हात दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील व्यापारवाढीसाठी व्यापाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे, तसेच शाश्वत पाण्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व आंबेगाव – शिरूर विधानसभेप्रमाणेच महाराष्ट्राला पाहिजे, या भावनेने आम्ही सर्वजण वळसे पाटील यांचा या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय होण्यासाठी काम करू, अशी ग्वाही घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद काळे, मंचर रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन निघोट व व्यापारी महासंघाचे सचिव आशिष पुंगलिया यांनी दिली.

डिंभे धरणाच्या बोगद्याचा प्रश्न मिटला, चार तालुक्यांतील बंधाऱ्यांना मिळणार पाणी; वळसेंकडून सर्व काही क्लिअर

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद काळे, ॲड. बाळासाहेब पोखरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद बँकेचे संचालक अजय घुले यांनी केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube