शरद पवारांनी विदर्भाच्या 7 जागा पदरात पाडल्या, कोणाला मिळाली संधी?

  • Written By: Published:
शरद पवारांनी विदर्भाच्या 7 जागा पदरात पाडल्या, कोणाला मिळाली संधी?

Sharad Pawar Group candidate list : विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election) महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने पहिली यादी जाहीर केली. पुण्यामध्ये जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं घोषित केली. या यादीत विदर्भातील सात जणांना संधी देण्यात आली.

Tanpure vs Kardile : राहुरीत पुन्हा तनपुरे विरुद्ध कर्डिले सामना रंगणार… 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत जयंत पाटील यांना इस्लामपूरमधून, अनिल देशमुख यांना काटोल तर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घनसांगवीतून, जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा-कळव्यातून आणि हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

‘कधीतरी खरं बोलायला शिका…’; सुजय विखेंनी घेतला थोरातांचा खरपूस समाचार

काटोलमध्ये अनिल देशमुख, सिंदखेड राजामध्ये शिंगणे…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत विदर्भातून सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश केलेल्यांना संधी देण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या यादीत काटोल मतदारसंघातून माजी मंत्री अनिल देशमुख हे रिंगणात आहेत. तर काही दिवसांपूर्वी अजित पवार गटातून शरद पवार गटात दाखल झालेले राजेंद्र शिंगणे यांना सिंदखेड राजा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

मागील आठवड्यातच शरद पवार गटात प्रवेश करणारे माजी आमदार चरण वाघमारे यांना तुमसरमध्ये संधी मिळाली आहे. अहेरी मतदारसंघातून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाग्यश्री आत्राम यांनी गेल्या महिन्यातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

आधी अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणि दोन महिन्यांनी शरद पवारांच्या गटात परतलेले रविकांत बोपचे यांना तिरोडामध्ये संधी दिली. रविकांत बोपचे हे माजी खासदार खुशाल बोपचे यांचे सुपुत्र आहेत.

शरद पवार गटाने मूर्तिजापूरमधून अपक्ष जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांना संधी दिली आहे.

विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या यादीतील सर्वात आश्चर्यकारक मतदारसंघ म्हणजे नागपूर पूर्व. काँग्रेसच्या नागपूर पूर्व मतदारसंघात पक्षाने शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना संधी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube