अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला खातेवाटपाचा तिढा सुटल्याची चिन्हे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची आहेत, याबाबतची यादी राज्यापाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या यादीवर आता राज्यापालांची सही होणं बाकी आहे. (maharashtra cabinet expansion ajit pawar […]
Dhananjay Munde News : उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे परळीत दाखल झाले. मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. त्यानंतर मुंडे परळीच्या वैजनाथ चरणी नतमस्तक झाले आहेत. छोटेखानी घेतलेल्या सभेत धनंजय मुंडेंनी मायबाप जनतेचे आभार मानत पहिल्यांदा जेव्हा […]
Balasaheb Thorat : अजित पवार महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायचे पण देवेंद्र फडणवीसांना मोकळं सोडायचे, असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) सांगितलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब थोरातांनी अजितदादांच्या बंडावर दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत का जावं लागलं? फडणवीसांनी सांगितलं कारण… थोरात म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीने […]
Vivek Patil : शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांनी थेट तुरुंगातूनच पत्र लिहित सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतला आहे. विवेक पाटील यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांचं आभार मानलं असून त्यांनी या निर्णयाबाबत कुठेही वाच्यता न करताच हा निर्णय घेत जाहीर केला आहे. त्यानंतर विवेक पाटील समर्थकांना त्यांनी निवृत्ती का घेतली असावी? हा प्रश्न पडला आहे. जयंत पाटील पवारांची […]
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणशिंग फुंकण्यात आल्याचं दिसून येत आहे. ठाण्यात आज भाजपची महाविजय कार्यशाळा 2024 पार पडली. यावेळी राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या कार्यशाळेत देवेंद्र फडणवीसांनी संबोधन केलं आहे. अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. […]
Raj Thackeray : राज्यात राजकीय घडामोडी घडत सुरु असतानाच उद्धव ठाकरेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आपल्या दौऱ्याला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी कोकणातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून ठाकरे आज खेडमध्ये होते. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्यांना आगामी निवडणुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असणार? याबाबत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. मागील काळात जे […]
Dcm Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-ठाकरे गटामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं होतं? ती गुपितं उघड केली आहेत. Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ फडणवीस म्हणाले, 2019 साली भाजप-शिवसेनेला […]
आता व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर सदस्यांना एकमेकांचे नंबर पाहता येणार नाहीत. कारण व्हॉट्सअपकडून नवीन फिचर लॉन्च करण्यात आलं आहे. या फिचरद्वारे युजर्सला आपला नंबर लपवता येणार आहे. म्हणजेत ग्रुपमधील कोणी तुमचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. 48 वर्षांपूर्वी अजितदादा ठरले होते ‘टॉमेटो किंग’; जिल्ह्यात मिळाला होता विक्रमी भाव या फिचरद्वारे आपण जर […]
Ncp Crisis : शरद पवार साहेबांची ही गुगली असेल तर 4 वर्षांनी कळणार असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लहामटे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण पहाटेच्या शपथविधीबाबत तब्बल तीन वर्षांनी शरद पवार यांनी […]
New Delhi : देशात मान्सून दाखल झाल्यानंतर उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीसह हरयाणात नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीसह यमुना नदीच्या पाणी पातळीने उच्चांक गाठला आहे. पुरामुळे नदीतून पाणी वाहण्याची ही पातळी आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. त्यामुळे दिल्लीसह हरयाणातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. #WATCH | Haryana: In […]