अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
राजभवनात असताना शपथविधीनंतर राजकारणातील नैतिकता अन् विश्वासार्हतेचं काय होणार? हा प्रश्न माझ्या मनात आला त्यानंतर आज मी शरद पवारांसोबत ठामपणे उभा असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज शरद पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हे बोलत होते. विशेष म्हणजे आजच मुंबईतील एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचीही बैठक पार पडत आहे. संजय […]
आमच्याकडे आमदार बनवणारा देव असल्याचं म्हणत साताऱ्याचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला डिवचलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची बैठक पार पडत आहे. अजित पवार गटाची एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये तर शरद पवार गटाची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक पार पडत आहे. शरद पवारांच्या बैठकीत शिंदे बोलताना त्यांनी अजित पवार गटाला […]
मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुजोर तरुणाने एका आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडिओ समोल आला आहे. दरम्यान, व्हिडिओची दखल घेत पोलिसांकडून या मुजोर तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. संतापजनक: मध्यप्रदेशात एका मुजोर तरुणाने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केलीये. आरोपी तरुण भाजपाशी संबंधित […]
संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची भूमिका वेगळी का? असा सवाल उपस्थित करत भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. महाविकास आघाडीबाबत ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे. आदित्य ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करुन महाराष्ट्राला माहिती देण्याचं आव्हान दिलं आहे. […]
शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही, शरद पवार सर्वांचे आहेत. आव्हाडांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांनी दिलीय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरुन शरद पवारांनी आपला फोटो वापरु नये, असं सांगितलं होतं. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनीही खोचक शब्दांत दम भरला होता. […]
Chandrashekhar Azad Attack : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून चार आरोपींना हरियाणामधील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आलीय. सध्या हे आरोप उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका अटक […]
NCP News : अजित पवार यांचं बंड यशस्वी झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आलीय. अजित पवार गटाला 42 आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आलीय तर फक्त 11 आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच बहुमत असल्याचं […]
एकनाथ शिंदेंच्या बंडादम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. “आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला पटेल म्हणाले, मागील […]
महाराष्ट्रासारखीच कर्नाटकातही तशीच परिस्थिती तयार होत असून कर्नाटकातही एक अजित पवार तयार होत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. वर्षाच्या अखेरीस चित्र बदलणार असल्याचा दावा एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. या दाव्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेत असताना बंड केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील घडामोडींना आता पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानतंर महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेसचं असल्याचं मानलं जातंय. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केलीय. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे […]