- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं
बीडमध्ये होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अडमाप खर्चावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’ या शब्दांत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या खर्चावरुन आता जयंत पाटील यांनी सत्ताधारी […]
-
Maratha Reservation : मुख्यमंत्री मनोज जरांगेंना भेटणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं…
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा सुरु असून शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलस्थळी यावं. अशी अट घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार की नाही? याबद्दल चर्चेला उधाण आलं होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ […]
-
‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; जरांगेंची लेक कडाडली
Maratha Reservation : मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही, वाघाची जात आहे वाघासारखेच फाडून टाकू, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मागील 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीत जरांगेंच आमरण उपोषण सुरु आहे, या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने त्यावर भाष्य […]
-
Cm Eknath Shinde : ‘विघ्नसंतोषी लोकांनी मोडतोड करुन ‘तो’ व्हिडिओ व्हायरल केला’
Cm Eknath Shinde : विघ्नसंतोषी लोकांनी मोडतोड करुन तो व्हिडिओ व्हायरल केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदत घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार […]
-
Marine Department Exam : परीक्षा केंद्रात नाहीतर हॉटेलमध्ये बसून दिली परीक्षा; 22 जणांवर गुन्हा
Marine Department Exam : मागील काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी परीक्षेपासून ते राज्य सेवा परीक्षेपर्यंत पेपर रॅकेट कार्यरत असून काही लाखांमध्ये पेपर मिळवून ते सोडवले जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशात आता मुंबईत केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मरिन इंजिनिअरिंग ऑफिसर परीक्षेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. […]
-
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; खुर्च्या फेकून देत घातला गोंधळ…
Gautami Patil : मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा न झाल्याचं समोर आलं होतं, या चर्चांना पूर्णविरामच मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. परभणीमध्ये दहिहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तरुणांना गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. तरुणांच्या गोंधळामुळे आयोजकाला […]
-
आठ महिन्यानंतर गोरक्षक मोनू मानेसरला अटक; मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याचा आरोप
Monu Manesar : राजस्थानातील दोन मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी गोरक्षक मोनू मानेसरच्या हरयाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हरयाणामधील आयएमटी परिसरात हरयाणा पोलिसांनी साध्या वेशात मोनू मानेसरवर अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. Maratha Reservation : पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही न्यायालयात आव्हान देणार; ओबीसी नेत्यांनी दंड थोपटले 16 फेब्रुवारी 2023 […]
-
Maratha Reservation : यवतमाळमध्ये मराठा आंदोलन चिघळलं; उपोषणाच्या मंडपातच आंदोलकाने विष घेतलं
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेलं असतानाच या आंदोलनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. उपोषण सुरु असतानाच एका मराठा आंदोलकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यवतमाळमधील उमरखेडमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. iPhone 15 सीरीज आज होणार लाँच, भारतात […]
-
Kerala : निपाह व्हायरसची धास्ती! केरळमध्ये दोन रुग्ण दगावले, केंद्राचं पथक दाखल…
Kerala : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसमुळे दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आल्याचं मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे. Maratha Reservation : […]
-
Maratha Reservation : पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही न्यायालयात आव्हान देणार; ओबीसी नेत्यांनी दंड थोपटले
मराठा आरक्षण प्रश्नी पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही जीआरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे(Prakash Shendge) यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत आज प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी […]









