सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलंय. पुढील 10 ते 15 दिवसांत राजकीय परिस्थिती बदलणार असून अजित पवारांसोबत गेलेले लोकं मागे फिरणार असल्याचं भाकीत रोहित पवारांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यावरुन राज्यात मोठा भूकंपच […]
Devendra Fadnvis News : उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय परिस्थितीचा विपरित परिणाम झालाय, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना फडणवीसांना ‘नागपुरचा कलंक’ म्हणत टीका केली होती. त्यावरुन फडणवीस-ठाकरे वाकयुद्ध रंगलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेण्यात आला […]
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून भारताचे गरीबीत लक्षणीय घट केली आहे. मागील 15 वर्षांच्या कालावधीत भारतात 41.5 कोटी नागरिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन ते गरीबीच्या पेचातून बाहेर पडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतात मागील 15 वर्षांत जवळपास 41.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या […]
कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या होते, मग अचानक साक्षात्कार कसा झाला? असा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतून भाजप-शिंदे गटासोबत सामिल झालेल्या अजित पवारांवर सडकून […]
आदिवासी तरुण लघुशंका प्रकरण मध्य प्रदेशात चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्या आदिवासी तरुणाचे पाय धुतले, औक्षण करीत त्याचा सन्मान केला होता, तो तरुण लघुशंका प्रकरणातील नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणावरुन विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या केल्या जात आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसकडून ट्विट करीत ‘खरा पीडित बेपत्ता आहे का? शिवराजजी, […]
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनीही उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना ट्विटर पोस्ट शेअर करीत ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. यावेळी ठाकरेंनी नागपुरातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचा ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’ असा उल्लेख केला. […]
जोपर्यंत मूळ पक्ष कोणाचा आहे? याची खात्री होत नाही तोपर्यंत आमदार पात्र/अपात्रतेवर निर्णय घेणं अवघड असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यात अद्याप शिवसेना पक्षात सुरु असलेला संघर्षावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या गटाने भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिलायं. त्यावरुन राजकारण तापलेलं आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या निर्णयाला […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहन होईना अन् सांगताही येईना अशी झाली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भर सभेत फडणवीसांचं राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याच्या विधानाची ऑडिओ क्लिप ऐकवत त्यांनी खिल्लीही उडवली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस […]
उद्धव ठाकरे राजकारणाच्या खालच्या स्तरावर उतरलेत, म्हणूनच ते आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घेत असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिराचं दर्शन घेऊन सुरुवात केलीय, त्यानंतर वाशिम, अमरावतीत छोटेखानी सभा घेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला […]
गिरीष महाजन तुम्ही तरबेज आहातच, पण राज्यात आता तीन पक्षाचं सरकार त्यामुळे आता राष्ट्रवादीचेही झेंडे लावत चला, असे शालजोडीतून टोमणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मारले आहेत. दरम्यान, धुळ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार जनतेला संबोधित करीत होते. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात असून […]