मुंबई :शिंदेंच्या बंडानंतर काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला नाही. महत्त्वाच्या खात्यांवर अजित पवार ठाम आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे […]
रोहित पवारांवरही (Rohit Pawar) उद्धव ठाकरेंसारखाच परिणाम झाला असल्याची जहरी टीका भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटलांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजपच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर रोख आहे. अशातच भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात असून आता उद्धव ठाकरेंनंतर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. […]
Neelam Gorhe News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हत. मात्र, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दलची सगळी हकीकतच सांगितली आहे. मी तर मृत्यूचीच वाट बघत होते, असे […]
सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला तरीही लोकशाहीत सर्वसामान्य मतदारच सर्व शक्तिमान असतो, असं खोचक ट्टिट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यावर ट्विट करत मतदारांनी दंडेलशाहीला झुगारत ममतादीदींच्या पदरात 90 टक्के ग्रामपंचायती टाकल्याचं […]
ईडीच्या संचालकाचा कार्यकाळ वाढवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना 31 जुलैपर्यंत कार्यालय खाली करण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच संजय कुमार मिश्रा यांच्या सेवेलाही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं आहे. ममतांचा किल्ला अभेद्य; बंगालमध्ये कमळ कोमेजले तर पंजा रिकामाच सर्वोच्च न्यायालय म्हणाले : अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवणं […]
Bengaluru Crime : कर्नाटकात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली आहे. माजी कर्मचाऱ्याने कंपनीच्या सीईओची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bangalore shook! MD and CEO killed by ex-employee of private company) Bengaluru, Karnataka | The […]
Mla Nitin Deshmukh News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी टीका करण्यामध्ये उद्धव ठाकरेंनाही मागे टाकलं आहे. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. जो मतिमंद आहे त्याला दुसऱ्यांची काय पारख? असा सवाल करीत देशमुखांनी बावनकुळेंचा समाचार घेतलाय तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला गद्दारांचा, भ्रष्टाचार आणि ईडीचा कलंक […]
GST Meeting : ऑनलाईन गेमिंग खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. जीएसटी कॉन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. (28 percent gst will be levied […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. लोकमान्य टिळक यांना मोदींना पुरस्कार देणं आवडलं नसतं, ते जिवंत असते तर त्यांनीही विरोध केला असता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानात हा पुरस्कार सोहळा पार पडणार […]
New Delhi Congress Meeting : मुलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच काँग्रेस फुटणार असल्याची अफवा भाजपकडून केली जात असून काँग्रेस तुटणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघात तयारी सुरु असल्याचंही पटोलेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे […]