महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी मुंंबई उच्च न्यायालयाने चमणकर बंधूंना दोषमुक्त केलंय. त्यामु्ळे मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालायं.
अहिल्यानगरच्या कोठला येथील नाल्यास गोमांस आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत रस्त्यावरील वाहतूक अडवलीयं.
कुणबी प्रमाणपत्र वाटपात खाडाखोड करुन मराठा कुणबीच्या नोंदी सादर केल्या जात असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलायं.
'बंजारा' अन् 'वंजारी' एकच, असं चुकीचं वक्तव्य करुन आरक्षणाचा लढा कमकुवत करु नका, या शब्दांत पंजाबराव चव्हाणांनी आमदार धनंजय मुंडेंना सुनावलंय.
स्वातंत्र्यानंतरच्या आंदोलनांमध्ये कोणाचा हात? कोणी फंडिंग केलं, यासंदर्भात संशोधन करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री अमित शाहांनी दिले आहेत,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी दुश्मन मानत नाही, ते मानत असतील, ते शिवसेना तोडत आहेत, तरीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फ्यूएल शिक्षण संस्था समूहच्या फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात व्यक्त केलंय.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या चुकांची पुन्हा गय केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.