अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज माघे घ्या अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, या शब्दांत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधलायं.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी धनगर बांधवांना दिला आहे.
चिंचवड मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. भेटीत अजितदादांनी मतदारसंघाची माहिती घेतली असल्याचं नाना काटेंनी स्पष्ट केलं.
विमानांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाकडून अमेरिकेसह इतर देशात उड्डाणे होणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत.
पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाचे उमेदवार अश्विनी कदम यांच्या नावाचे तीन अर्ज दाखल झाले असल्याचं समोर आलंय.
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
भाजपने राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचं काम केलं असं समजणं हा महाविकास आघाडीचा भ्रम असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी दिलंय..