मुंबई : काँग्रसेच्या महाअधिवेशनात अडथळे आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अधिवेशन होणारच, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. पटोले म्हणाले, काँग्रेसचं रायपूर इथलं महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही, असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही. […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यावरुन श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे गोंधळ घालत असल्याचं दिसून येतंय. अक्षय गोडसे यांनी आधी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला आता भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. अक्षय गोडसे म्हणाले, हेमंत रासने आमच्या घरातील सदस्य असून गेल्या 80 […]
पुणे : माझ्यावर हायकमांडकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंना एका मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं, त्यावर पटोलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच माझ काम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील पाच जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुका पार […]
औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला […]
औरंगाबाद : टीईटी घोटाळ्यातील (TET Scam) शिक्षकांसदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सेवेत संरक्षण आणि थकीत वेतन साठ दिवसांत जमा करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती. रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत. 2018 साली टीईटी परिक्षा घोटाळ्यात जवळपास 7 हजार 880 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. या […]
पुणे : येत्या 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची पुण्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. ही सभा पाहून विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान,पुण्यातील खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर कदम यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी […]
पुणे : पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी खळबळ झालीय. कसबा पोटनिवडणुकीत रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा प्रचार मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून केला जात होता. राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतरही मनसेचे काही पदाधिकारी रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यामुळे मनसेकडून या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सहा जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली […]
अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले. उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या […]
अहमदनगर : राज्य सरकारच्यावतीने आज महसूल आणि वन विभागाच्यावतीने महसूल परिषद-2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालं. राहता तालुक्यातील लोणी इथं महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे प्रथमच अशी राज्यस्तरीय परिषद राज्याच्या ग्रामीण भागात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ […]
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ […]