अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते […]
पुणेः आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. या तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीवर वळसे पाटील गटाची सत्ता आली आहे. एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे, तर एक ग्रामपंचायत ठाकरे गटाला मिळाली आहे. आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली या ग्रामपंचायती बिनविरोध […]
अहमदनगरः पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येही धक्कादायक निकाल लागले आहेत. वनकुटे गावामध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झालाय. लंकेंसाठी हा मोठा धक्का आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अॅड. राहुल बबन झावरे हे प्रथम लोकानियुक्त सरपंच निवडून आले होते. यंदा ही जागा महिलांसाठी राखीव होती. यावेळी झावरे यांची पत्नी स्नेहल या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा स्थानिक विकास […]
कोल्हापूरः कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या समरजित घाटगे गटाने बाजी मारली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ गटाकडून घाटगे गटाने ग्रामपंचायती हिसकावून घेतल्या आहेत. कायम सत्ता असलेल्या मुश्रीफांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींच्या मतमोजणी सुरू आहे. त्यात कागल तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटाला […]
नागपूरः महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सीमावादाचा प्रश्न चिघळत आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फेक अकाउंटवरून ट्वीट केल्यामुळे तणाव निर्माण होत असल्याचे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीमावादात ट्वीटरच्या मालकालाही ओढले आहे. जयंत पाटील यांनी मस्क यांना केलेल्या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या […]
अहमदनगर : राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. लोकायुक्त कायद्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हजारे म्हणाले, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. चांगला निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जो […]
नागपूर:अनेक कारणांमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादात अडकले आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीने आंदोलने केली आहेत. आता पुन्हा राज्यपाल हे एका वादात सापड. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे. याबाबतचा मुद्दा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी […]
नागपूरः नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी राज्यातील अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हे सरकार कोणाचे काही ऐकत तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण […]