Road Accident : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत (Road Accident) चालली आहे. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-आग्रा महामार्गावर एक भरधाव ट्रक चहाच्या दुकानात घुसला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. […]
Vinod Tawde : भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी काल भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतना तावडे यांनी पुन्हा एकदा इतिहासातील गोष्टी बाहेर काढत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत गद्दारी केली नसती तर राष्ट्रवादीला सोबत घेतलंच नसतं, असं मोठं विधान तावडे यांनी यावेळी […]
IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर आजपासून एकदिवसीय (IND vs SA 1st ODI) क्रिकेट सामने सुरू होत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला सामना होत आहे. या सामन्याची तयारी दोन्ही संघांकडून केली जात आहे. सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधारी केएल राहुल (KL Rahul) याने मोठा खुलासा […]
Malta Flagged Vessel MV Ruen : अज्ञात लोकांनी माल्टा देशाचा ध्वज असलेले एका मालवाहू जहाजावर कब्जा केला होता. मात्र या प्रकाराची माहिती होताच भारतीय नौसेनेने कारवाई करत हा प्रकार हाणून पाडला. भारतीय नौसेनेने सांगितले की अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सहा अज्ञात लोकांनी एका मालवाहक जहाजाचा ताबा घेतला होता. […]
Ratan Tata Threat Call : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आज धमकी देण्यात (Ratan Tata Threat Call) आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्यक्तीच्या धमकीनंतर पोलिसांनी रतन टाटांच्या सुरक्षेत वाढ केली होती. दुसरीकडे या व्यक्तीचा शोध घेण्याचेही काम सुरू केले होते. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढलाच परंतु, नंतर पोलिसांना वेगळीच स्टोरी समजली. फोन करणारा व्यक्ती […]
Parliament Security Breach : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना थेट संसदेत (Parliament Security Breach) घुसून धुडगूस घालणाऱ्या आणि संसदेबाहेर आंदोलन केल्याप्रकरणात रोज नवनवीन आणि तितकेच धक्कादायक खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी पोलीस करत असून या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) […]
Pune News : विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात शिक्षण, रोजगारासाठी रोज हजारो विद्यार्थी आणि (Pune News) बेरोजगार येतात. त्यांना सर्वात आधी राहण्याचा प्रश्न भेडसावतो. पुण्यात निवासी मिळकतीत वसतिगृह, सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये भाड्याने खोल्या मिळतात. संबंधित जागांचे मालक यातून चांगले उत्पन्नही मिळवतात. मात्र, आता हेच उत्पन्न महापालिकेच्या रडारवर आले आहे. वसतिगृह, सर्व्हिस अपार्टमेंट, पेईंगगेस्ट सुविधा […]
Devendra Fadnavis : उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हाप्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता. आता नावच कुत्ता आहे. या कुत्तासोबत स्वतःच्या फार्महाऊसवर कुत्त्यासाठी पार्टी ठेवतो. आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा. म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जेलमधून सुटून आलाय अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी चाललं आहे. अरे शरम वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दांत हल्लाबोल […]
Eknath Shinde Calls Anna Hajre : आज बरोबर अकरा वर्षे उलटून गेली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी लोकपाल विधेयकासाठी राजधानी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं. या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. केंद्र सरकारसह विविध राज्यात विविध नियम अटींसह लोकपाल विधेयक अस्तित्वात आलं. त्यानंतर काल राज्य विधिमंडळातील अधिवेशनादरम्यान (Maharashtra Winter Session) थेट मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री […]
Pune Metro : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पुण्यात मेट्रो सुसाट धावू (Pune Metro) लागली. पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायक करणाऱ्या या महामेट्रो रेल्वेला नगर रोडवरील येरवडा, रामवाडी भागात मात्र ब्रेक लागला आहे. येरवडा स्थानकाचे जिने रस्त्यात येत असल्याने महापालिकेने त्यात बदल सुचवला. तर दुसरीकडे नगर रस्त्यावरील नागरिकांनी येरवडा आणि […]