One Nation One Election : देशात लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच वन नेशन, वन इलेक्शनचा (One Nation One Election) आवाज वाढत चालला आहे. वन नेशन वन इलेक्शनवर अहवाल तयार करण्याची जबाबदारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात आली आहे. सन 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा मुद्दा उचलला होता. […]
Aditya L1 Budget : चंद्राची मोहिम यशस्वी पार पाडल्यानंतर भारताने सूर्याच्या दिशेने जाण्याची तयारी केली आहे. थोड्याच वेळात इस्त्रोचे आदित्य एल1 (Aditya L1 Budget) यान सूर्याकडे झेप घेणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याची अनेक रहस्ये आपल्यासमोर येतील. या मोहिमेसाठी मोठा खर्च तर झाला आहेच पण जगातील अन्य देशांच्या तुलनेत हा खर्च कमीच आहे. याआधी भारताने […]
Raj Thackeray : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे […]
Maratha Reservation : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात पाय ठेवल्यास त्यांचा तीव्र विरोध करू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. तर […]
Aditya L1 Mission : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने आणखी एक धाडसाची कामगिरी हाती घेतली आहे. संपूर्ण भारतवासियांचे लक्ष वेधणारे आदित्य L1 चे (Aditya L1 Mission) आज प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे संचालक एस. सोमनाथ यांनी दिली. Chandrayaan […]
Prithviraj Chavan : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) […]
Earthquake : मागील काही दिवसांपासून भूकंपाचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशात मागील काही दिवसांत शक्तीशाली भूकंप झाले आहेत. आता भारतातील कच्छ मध्ये जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, कच्छमधील दुधई परिसरात रात्री 8.45 वाजण्याच्या […]
Singapore : सिंगापुरात जवळपास एक वर्षानंतर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे के.थरमन शणमुगारत्नम यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत शणमुगारत्नम यांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त मिळाली. सिंगापूर निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली. याआधी शुक्रवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केले होते. त्रिशंकू सामन्यात शणमुगारत्मही मैदानात होते. सकाळी आठ वाजल्याापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या. दरम्यान, याबाबत […]
Pakistan : पाकिस्तानात महागाईने जनता हैराण झाली आहे. त्यातच आता सरकारने घेतलेल्या निर्णयाने महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कार्यवाहक सरकारने पेट्रोल 14.91 रुपये प्रति लिटर आणि हाय स्पीड डिझेल दरात 18.44 रुपये वाढ केली आहे. पाकिस्तानी अर्थमंत्रालयाने याबाबत एक ट्विट केले आहे. पेट्रोलची किंमत 305.36 रुपये प्रति लिटर […]
Shirdi Lok Sabha : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. शिर्डी लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मागच्यावेळी शिर्डी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या विरोधात चुकीचा प्रचार झाला. मात्र आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची आहे, असे आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट […]