Sujay Vikhe : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी (Vijay Auti) यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली. पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स येथे आयोजित […]
Maharashtra Politics : केंद्रीय नेतृत्वाचा आदेश मान्य करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं. त्यानंतर मुख्यमंक्षी पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. आता शिंदे-फडणवीस सरकार येऊन नऊ महिने उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मनातलं सांगून टाकत देवेंद्र फडणवीसच […]
Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर निघून गेल्याने ते नाराज […]
Devendra Fadnavis on Barsu Refinery : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही […]
Prajkta Tanpure : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा सिल्वासा येथे रोड शो होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून तब्बल 700 बस सोडण्याचे फर्मान शिंदे फडणवीस सरकारने सोडले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांनी तीव्र शब्दांत सरकारच्या या कारभाराचा निषेध केला आहे. […]
Barsu Refiney News : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)मुख्यमंत्री असतानाचे एक पत्र समोर […]
Pune News : पुण्यातील (Pune) कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेत आमदार बनलेले रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) चर्चेत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, येथे धंगेकर यांनी जबरदस्त कामगिरी करत भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता धंगेकर त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांनी केलेल्या […]
सोशल मीडियात सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक छोटी चिमुकली पियानो वाजवितानाचा हा व्हिडीओ आहे. जो तो या मुलीच्या टॅलेंटचे कौतुक करत आहे. प्रधानमंत्री मोदींनीही (PM Modi) या चिमकुलीच्या टॅलेंटचे कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हा व्हिडीओ सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. असाधारण प्रतिभा आणि क्रिएटिविटी. शाल्मलीला शुभेच्छा.’ असे मोदींनी म्हटले […]
World Malaria Day : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे घरोघर व्हायरल आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ताप, खोकल्याचे रुग्ण आहेतच शिवाय डासांपासून होणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुण्या या आजारांचेही रुग्ण आढळतात. सध्या हे आजार नियंत्रणात आहेत. पावसाळा दोन महिन्यांवर आला आहे. या दिवसांत किटकजन्य व साथरोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे. आज (25 एप्रिल) जागतिक […]
Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पडद्यामागेही काही हालचाली घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या रजांचे असे कोणतेच नियोजन नव्हते. तरी देखील त्यांनी तीन दिवसांची […]