- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
बाळासाहेब थोरातांनी हेरला भाजपचा प्लॅन; कार्यकर्त्यांना सांगितले सावध राहा..
Balasaheb Thorat : राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार आहे. तसे आताच स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहणे जास्त गरजेचे आहे. आपण एकत्र राहिल्यास लोकसभेच्या 38 तर विधानसभेच्या 180 जागा जिंकू शकतो. ग्रामीण भागात भाजप कुठेही नाही. कारण, येथील हित त्यांच्या अजेंड्यातच नाही. मात्र आता ते प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध रहावे […]
-
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी पेटवली चूल; गॅसदरवाढीचा केला निषेध
मुंबई : ‘या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.. बजेटमध्ये भोपळा देणार्या सरकारचा धिक्कार असो.. महागाई वाढवणार्या सरकारचा धिक्कार असो..’ अशा घोषणांनी आज विधिमंडळाचा परिसर दणाणला. वाढती महागाई (Inflation) आणि गॅस दरवाढीच्या (LPG Price Hike) निषेधार्थ आज […]
-
पराभवाचा वचपा ! काँग्रेसला धक्का देत टीएमसीने भाजपला ‘अशी’ केली मदत
Congress : विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीएमसीने बंगालमध्ये एकला चलो रे चा नारा देत काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच खेळी केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला दांडी मारत तृणमूल काँग्रेसने त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. या […]
-
शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना सरकारला दिसत नाहीत का ? ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला संतप्त सवाल
Supriya Sule : राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत शिंदे सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का ?, असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी […]
-
विधानपरिषदेत खडाजंगी.. हक्कभंग आणण्याचा अनिल परबांचा इशारा; पहा काय घडले ?
Mumbai News : मुंबई महापालिकेत सॅनिटरी नॅपकीन खरेदीत 42 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अनिल परब (Anil parab) यांनी केला होता. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. मंत्र्यांनी या संदर्भात दिलेली माहिती जर चुकीची असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला. […]
-
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य; संपकऱ्यांना केली ‘ही’ विनंती
Devendra Fadnavis on Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या कर्मचाऱ्यांनी संप केल्याने आरोग्य, वाहतूक यांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरत्या कोलमडल्या आहेत. या आंदोलनावर सरकारने तत्काळ तोडगा काढावा, नागरिकांचे हाल थांबवावेत अशी मागणी विरोधी पक्षांनी केली […]
-
फडणवीसांनीही केली आठवलेंच्या स्टाईलची कॉपी; तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही..
Devendra Fadnavis : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची कविता कुणी ऐकली नसेल असा एकही राजकीय नेता निदान महाराष्ट्रात तरी नसेल. इतकेच काय तर संसदेतही त्यांच्या कविता बऱ्याचदा हास्यकल्लोळ उडवून जातात. आता त्यांच्याच कवितेची स्टाईल घेत विधिमंडळ अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले वक्तव्य चांगलेच गाजत आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]
-
शीतल म्हात्रे मला बहिणीसमान; व्हायरल व्हिडीओप्रकरणी सुर्वे तीन दिवसांनंतर बोलले..
Prakash Surve : वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी अखेर तीन दिवसांनंतर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी मौन सोडले आहे. सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांना निवेदन पाठवत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तीन दिवसांनंतर बोलण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. या पत्रात त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणीतरी त्यात गाणं अपलोड […]
-
Maharashtra Police : फडणवीसांचे गृहखाते अजितदादांच्या रडारवर; म्हणाले, आता पोलिसांनाच..
Budget Session : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस सतत कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता […]
-
.. म्हणून पवारांना आम्ही घाबरतो; गुलाबरावांनी सांगितले भन्नाट कारण, वाचा..
Gulabrao Patil News : राज्य सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याच्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक मजेशीर वक्तव्य केले आहे. ‘पवारांसारखी […]










