पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या समितीने आता राज्यभर काम सुरु केले आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या आणि कक्ष स्थापन केले आहे. या समितीची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गतीने हे काम करावे, संबंधित विभागांनी या कामासाठी […]
मुंबई : शिवसेना आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची श्री. सिद्धीविनायक गणपती मंदीर विश्वस्थ व्यवस्था, व्यवस्थापन समितीचे (न्यास) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांची 23 जुलै 2023 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर शिंदे सरकराने सरवणकर यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. याबाबतचे राजपत्र जारी करत हा […]
छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांच्या मुलांचं कल्याण न होऊ देण्याचं, त्यांना त्रास देण्याचं दोन-तीन ओबीसी (OBC) नेत्यांचं षडयंत्र आहे, यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी पाठिशी खंबीर उभे रहावे. मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी नेत्यांचे हे षडयंत्र हाणून पाडावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णालयातून उपचार […]
पुणे : अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एक 30 वर्षीय महिलेविरुद्ध हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने पोलीस (Police) स्थानकात तक्रार दाखल केली होती. (Extortion demand of Rs 20 lakh from woman threatening to reveal immoral relationship) याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित […]
मुंबई : ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) सर्व बांधकाम तुर्तास बंद ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही दिवस बांधकाम बंद राहिले तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल करत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. यावेळी शिंदे सरकार (Eknath Shinde) आणि मुंबई महापालिकेकडून बांधकाम सुरु ठेवण्यासाठी विनंती […]
नवी दिल्ली : श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ‘टाईम आऊट’ होणारा पहिला बॅट्समन ठरला आहे. वेळेत स्ट्राईकला येऊन पहिला बॉल फेस न केल्याने त्याच्यावरही ही लाजिरवाणी वेळ ओढावली आहे. यामुळे मॅथ्यूज चांगलाच ट्रोल होऊ लागला आहे. सोबतच हा नियम नेमका काय आहे? याविषयी देखील सवाल विचारला जाऊ लागला आहे. (Angelo Mathews becoming […]
दिल्लीत : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान श्रीलंकन (Sri Lanka) संघाला एका लाजिरवाण्या गोष्टीला सामोरे जावे लागले. यावरुन सामन्यादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला (Angelo Mathews) टाइमआउट घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे. (Angelo Mathews becoming the first batter to be timed out […]
पुणे : पवार कुटुंबियांचे मूळ गाव काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ‘दादा’ ठरले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पुरस्कृत पॅनेलने 16 पैकी 14 जागांवर मुसंडी मारत काटेवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तर भाजप (BJP) पुरस्कृत पॅनेलचेही दोन उमेदवार विजयी झाले आहेत. काल (5 नोव्हेंबर) 16 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (6 […]
नवी दिल्ली : विधिमंडळात मंजूर झालेल्या विधेयकांवर राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी करावाई करावी, त्यांना विधेयके परत पाठविण्याचा अधिकार आहे. मात्र थोडे आत्मपरीक्षण करावे आणि ते जनतेने निवडलेले नाहीत हे समजून घ्यावे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यपाल विरुद्ध पंजाब सरकार वादावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehata) यांना […]
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफकडून भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) सीमेच्या भिंतींवर आता मधमाश्या पाळण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे जनावरांच्या तस्करीसाठी कुंपणावरील झुडपे कापणे तसेच इतर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात बीएसएफच्या […]