पुणे : इंटरनेट जगतातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगल (Google) त्यांचे दुसरे सर्वात मोठे ऑफिस हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारत आहे. तब्बल 30 लाख स्केअर फुटचे हे ऑफिस गुगलच्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ‘माउंटन व्ह्यू’ मुख्यालयानंतर हे दुसरे सर्वात मोठे असणार आहे. या ऑफिसचे बांधकाम सध्या सुरु असून यामुळे जवळपास 18 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .गुगल […]
आग्रा : येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी (Prajapati Brahma Kumari) आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकता (38) आणि शिखा (32) अशी दोघींची नावे आहेत. आत्महतेपूर्वी दोघांनी तीन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात त्यांनी आत्महत्येसाठी संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले आहे. यासोबतच सुसाईड नोटमध्ये दोन्ही बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]
मुंबई : रेशन दुकानावर धान्यासोबतच आता साडीही मोफत मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी पुढील पाच वर्षे दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला एक साडी मोफत मिळणार आहे. अंत्योदय अर्थात पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांची संख्या 24 लाख 58 हजार […]
पुणे : ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचा पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास बळावल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले आहे. मागील 4 दिवसांपासून ललित पाटीलला हा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याला ससूनमध्ये आणण्यात आले आहे. मात्र त्याला अॅडमिट करणार नसून केवळ उपचार करुन त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात येणार आहे. (Drug mafia Lalit […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लिहिलेले ‘अॅबडन्स इन मिलेट्स’ हे गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी फालू शाह आणि त्यांचे पती गौरव शाह यांच्यासोबत हे गाणे लिहिले होते. जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी नामांकनात एखाद्या राजकारण्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे दुसरे उपोषण हे सरकारसाठी अत्यंत नाजूक गोष्ट झाली होती. ते नेमके हाताळायचे कसे हेच सरकारपुढे मोठे कोडे होते. लाठीचार्ज झाल्यामुळे पहिले उपोषण संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आणि आंदोलनाला ताकद मिळाली. तर दुसऱ्या उपोषणावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव वाढवत पाणीही सोडून दिले होते. त्यांची […]
पाटणा : बिहारमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीयांसाठींच्या आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून एकूण 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्ष भाजपनेही (BJP) या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे विधानपरिषदेते मंजुरीची केवळ औपचारिकता बाकी आहे. (Bihar Assembly on Thursday cleared a Bill to increase the reservations) विधानपरिषदेच्या […]
पुणे : लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नामदेव जाधव स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज असल्याचे खोट सांगून जनेतची दिशाभूल करत आहेत आणि मोठ्या रक्कमा जमा करत आहेत. याशिवाय मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देत असून शरद […]
मुंबई : कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत किंवा कोणी कोणाच्या अंगावरही गेले नाही. अत्यंत खेळीमेळीत चर्चा झाली. मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षण मुद्द्यावर काही वक्तव्य माझ्याकडून आणि काही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आली. पण यापुढे विसंगती करणारी वक्तव्य करु नये असे फक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे […]
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे (Pune) लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर केली नाही, असा सवाल करत विधी पदवीधर तरुण सुघोष जोशी यांने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. पोटनिवडणूक न घेतल्यामुळे मतदारांच्या प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराची पायमल्ली होत आहे, असा दावा करत ताबडतोब पोटनिवडणूक घेण्याचा आदेश किंवा इतर कोणतेही […]