अमरावती : माझा अमरावती दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे मी पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीला अनुपस्थित होतो. मात्र अजित पवार यांनी तातडीची बैठक घेतली. त्यामागे कारणही महत्वाचं होतं. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे. मी बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण ते तांत्रिक कारणामुळे शक्य झाले नाही. मात्र दुपारच्या […]
मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. (Welcoming the decision to cancel contract recruitment, Agriculture Minister Dhananjay Munde […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अभय दिले आहे. न्यायालयाने आज (20 ऑक्टोबर) राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल करण्याच्या निर्णायाला दिलेल्या आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. तसेच ही याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली. […]
पुणे : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे ते सगळं सांगणार” असं म्हणतं ललित पाटीलने (Lalit Patil Arrest) अटक होताच मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधकांकडून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज […]
पुणे : स्टेडियम रिकामे असणे, पण तिकीटच न मिळणे ही क्रिकेट चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया आज (19 ऑक्टोबर) सुरु असलेल्या ‘भारत विरुद्ध बांग्लादेश’ या वर्ल्ड कप सामन्यावेळीही कायम आहे. ऑनलाईन तिकीटे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास तिकीटे सोल्ड असा मेसेज येत होता, पण त्याचवेळी स्टेडियममध्ये मात्र मॅच चालू होऊन तब्बल दीड तास झाला तरीही बहुतांश बाकडे रिकामेच असल्याचे […]
मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आमदार पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीचे 2 उत्पादन युनिट बंद करण्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 16 ऑक्टोबरला याबाबतचा आदेश राखून ठेवला होता. (Bombay High Court sets […]
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) चे कॅडेट कॅप्टन प्रथम गोरख महाले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 16 ऑक्टोबर रोजी खडकवासला येथील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु बुधवारी […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील बाबुराव कावळे या युवकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, कावळे चिकनगाव (ता. आंबड) येथील ते रहिवासी आहेत. काल (18 ऑक्टोबर) सायंकाळी ते कामावर जातो, असं सांगत घरुन निघाले होते. मात्र आज (19 ऑक्टोबर) पहाटे वांद्रे […]
पुणे : सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. न्यूझीलंडने त्यांचे चारही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ तिन्ही सामने जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. भारतीय संघाला […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पॅलेस्टाईन समर्थनार्थ दिलेल्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर यापूर्वीच निशाणा साधला होता. अशात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही शरद पवार यांच्या पॅलेस्टाईनबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मला वाटते शरद पवार […]