विष्णू सानप : अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special […]
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (24 ऑक्टोबर) संपत आहे. रात्रीपर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास उद्यापासून तीव्र आमरण उपोषण करण्याचा आणि मंंत्र्यांना गावबंदी जाहीर करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या संपत आलेल्या या अल्टिमेटमची पहिली झळ आज पुण्यात शरद पवार यांना […]
मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला तेलंगणातील अधिकाऱ्यांनी डिसेंबरमधील वेळ दिला आहे. या समितीला 1901-02 आणि 1931 मध्ये झालेल्या जनगणनेच्या नोंदी व महसूल विभागाची जुनी कागदपत्रे तपासायची आहे. मात्र तेलंगणामधील अधिकारी विधानसभा निवडणुकींच्या कामात व्यस्त असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जुनी कागदपत्रे देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. […]
पुणे : युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मध्यस्थी करु. त्यासाठी सर्व मागण्या एकत्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. बैठक बोलवू, त्यावेळी या मागण्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहु आणि मुख्यमंत्र्यांकडून मागण्याबाबत सकारात्मक उत्तर घेऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. […]
रत्नागिरी : “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही” असं म्हणत माजी खासदार आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विजयादशमीदिनी त्यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली. त्यांनी केलेल्या या अचानक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. एका टेलिग्राम ग्रुपच्या संदर्भाने WION या वृत्तसंस्थेने यासंबंधीत वृत्त दिले आहे. ही बातमी द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेस या ब्रिटीश वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. (Russian President Vladimir Putin has suffered cardiac arrest. Media reports are claiming that he was found lying on […]
मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून ‘मुदतवाढ दिली जावी’ अशी मागणी समितीनेच केली होती. ही मुदतवाढ देण्यास सामान्य प्रशासन विभागाने मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश लवकरच काढण्यात येणार […]
पुणे : मनोज जरांगे पाटील. सध्याच्या दिवसांमधील सर्वात चर्चेतील नाव. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मागील काही दिवसांपासून शिंदे सरकारवर कमालीचा दबाव निर्माण केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हीच मागणी लावून धरत त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी तब्बल 17 दिवसांचे उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या […]
मुंबई : राज्यातील शिंदे सरकारने आजच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केलेली जाहिरात खेदजनक आहे. “शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा”, असे या जाहिरातीत नमूद केलं आहे. म्हणजे आता मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे शिंदे सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस […]
नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच कर्नाटकचे मंत्री एन.एस. बोसराजू यांची देखील विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहमतीने या नियुक्त्यांची माहिती दिली. (Former Maharashtra Chief Minister […]