बारामती : माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रद्द केला आहे. “शेतकऱ्यांच्या हाताने गळीत हंगामाचा शुभारंभ करा, अशा सूचना करत त्यांनी या कार्यक्रमासाठी बारामतीला (Baramati) न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar has canceled the tour of Malegaon Cooperative Sugar Factory) राज्यात […]
लातूर : माजी राज्यमंत्री आणि अहमदपूरचे माजी आमदार विनायक जाधव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये खूप गर्दी झाली आहे, त्यामुळे माझी कुचंबना होत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) राम-राम ठोकला. विनायक पाटील (Vinayak Jadhav-Patil) हे यापूर्वी 1999 आणि 2014 या निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 1999 मध्ये […]
मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी तिघांची नावे आहेत. तिघांनाही पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Mangesh Sable who vandalized the vehicle of lawyer Gunaratna Sadavarte by pelting […]
पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांच्या निधनाने अतिव दुःख झाले, ते देशाचे अनमोल रत्न होते, त्यांनी कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून जे समाज जागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते शिर्डीमधून विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. भाषणाच्या […]
शिर्डी : “आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले. […]
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाने डोकं वर काढलं आहे. अशातच मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज (26 ऑक्टोबर) पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तिघा जणांना अटक केली […]
विष्णू सानप : भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने भाजपला दोन शहरांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांच्यामुळे भाजपचे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे पिंपरी – चिंचवड शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील […]
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात पुणे (Pune) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातून पलायन करण्यास ललित पाटील (Lalit Patil) याला मदत केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि नाशिक येथील एका सराफ व्यवसायिकाला अटक केली आहे. (Police have arrested two people on the charge of helping drug smuggler […]
पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजरपणामुळे ते अंथरुनालाच खिळून होते. अखेरीस आज (26 ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजता नेरुळ जिमखानासमोर त्यांनी उभारलेल्या श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (27 ऑक्टोबर) सायंकाळी […]
मुंबई : दिव्यांग वधू विराली मोदी (Virali Modi) यांना विवाह नोंदणी कार्यालयात झालेल्या मनस्तापाची दखल घेत विवाह नोंदणी अधिकारी अरुण घोडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच त्यांची रवानगी चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. निलंबनाच्या कार्यकाळात त्यांना चंद्रपूर मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (Marriage registrar Arun Ghodekar […]