नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारले, असा गंभीर आरोप भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. अदानी समूहाविरोधात प्रश्न विचारून उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न केला, असं दुबे यांनी म्हंटलं आहे. याबाबत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या चौकशीची मागणी केली […]
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अजित पवार चांगलेच वादात सापडले आहेत. 2010 मध्ये येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला […]
मुंबई : “देवेंद्र फडणवीस, त्या गुणरत्न सदार्तेला समजावा. तो तुमचाच कार्यकर्ता आहे. त्याला मराठ्यांच्या अंगावर सोडू नका. मराठ्यांना उचकवू नका” असं जाहीरपणे म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकांमुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे गुणरत्न सदावर्ते पुन्हा […]
पुणे : पुणे-दौंड प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावर आता इलेक्ट्रिक लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून त्याला अंतिम मान्यता मिळताच या मार्गावरील प्रवासाचा वेग वाढणार आहे. मागील अनेक वर्षांपासून दौंडच्या नागरिकांनी मेमू गाड्या सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. डेमू (डिझेलवरील) गाड्यांऐवजी मेमू गाड्या […]
ठाणे : आगामी वर्षात मुदत संपत असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघातील जिल्ह्यांमधून सध्या मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे. भाजपकडून इथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याही दोन्ही गटांनी इथून तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. […]
छत्रपती संभाजीनगर : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या जोडीदार ईशा झा यांच्याशी त्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या विवाहाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. मागील दोन वर्षांपासून हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा एकत्र आहेत. आता त्यांनी या नात्याला लग्नाचे नाव […]
छत्रपती संभाजीनगर : येथील नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण टेम्पो अपघात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. यातील 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री […]
“मी कधीही अशा जमिनीच्या लिलावात सहभागी झालो नाही. खरे तर अशा लिलावांना माझा विरोध आहे. इतकंच नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाहीत. आम्ही अशा जमिनी विकू शकत नाही,” असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपांना प्रत्तुत्तर दिलं आहे. बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर पुस्तकातून पोलील दलाच्या […]
पुणे : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पोलील दलाच्या जमीन विक्रीचे गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Former Police Commissioner Meera Borwankar made serious allegations against Deputy Chief Minister Ajit Pawar for […]
मुंबई : ऑलिम्पिक 2036 च्या आयोजनाची भारताला संधी मिळाल्यास कुठलीही कसर सोडणार नाही, कारण हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताची दावेदारी जाहीरपणे सादर केली आहे. ते मुंबईत ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही, मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या […]