मुंबई : भारताच्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. यंदाच्या वर्षी कंपनीकडून कोणत्याही कॉलेजमध्ये कॅम्पस भरती केली जाणार नसल्याची घोषणा कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी निलांजन रॉय यांनी केली. ते कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या अर्निंग कॉलदरम्यान बोलत होते. गतवर्षी कंपनीने मागणीपेक्षा जास्त 50 हजार फ्रेशर्सची भरती केली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करु नका. आमदार अपात्रतेबाबत पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णय घेतला जावा, असे तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. याशिवाय नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रकही न्यायालयाने फेटाळले असून येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले. उद्धव […]
मुंबई : राज्य सरकारने बाह्ययंत्रणेच्या अर्थात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आतापर्यंत चार विभागांतील 11 हजार 203 जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर केले आहेत. तर नोव्हेंबरपर्यंत याच पद्धतीने एक लाख पदे भरण्यात येणार आहेत, असे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिले आहे. याच वृत्तावरुन राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही ठराविक व्यक्तींच्या जवळच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी कंत्राटी […]
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा, असा सबुरीचा सल्ला स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाला दिला आहे. ते पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. […]
पुणे : संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांचे पक्ष एकत्र येत राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाणं आलं होतं. मात्र या चर्चांना आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी पूर्णविराम दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवर आंबेडकर यांनी फुल वाहिली होती. मी त्यांना विद्वान समजत होतो. मात्र त्यांच्या या कृतीमुळे आपलं मतपरिवर्तन झालं […]
पुणे : पालकमंत्री म्हणून शुक्रवारचा दिवस पुणे जिल्ह्यासाठी अन् शनिवारचा दिवस बारामती मतदारसंघासाठी हा आपला जुना शिरस्ता कायम ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर आज (शुक्रवार) प्रथमच पुण्यात येत आहेत. आज दिवसभर ते शासकीय विश्रामगृहात पुण्यातील विविध विकासकामांबाबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सलग आठ तास बैठका घेणार आहेत. (Guardian Minister […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार येत्या दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमधून आणि 28 तालुक्यांमधून ही यात्रा निघणार आहे. एकूण 22 मुद्द्यांवर आधारे ही यात्रा असणार आहे. दसऱ्याला (24 ऑक्टोबर) पुण्यातील भिडे वाडा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने यात्रेची सुरुवात होणार असून नागपूरमध्ये पवार यांच्याच […]
पुणे : महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (9 ऑक्टोबर) राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यावेळी आयोगाकडून नागालँडमधील एका विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र पुणे आणि चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीची घोषणा केलेली नाही. (no by-elections […]
पुणे : पर्वती भागातील मुक्तांगण (Muktangan School) शाळेतून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शाळेतील 7-8 मुलांचे लैगिक शोषण त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. या प्रकारानंतर पालकांशी शाळेच्या आवारात गर्दी केली तसंच काही वेळ शाळाही बंद पाडली. याबाबत पोलिसांनी पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन […]
अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी शाळेतून परत येत असताना रासने नगर जवळ त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी आज (9 ऑक्टोबर) या हल्ल्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. […]