मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं कधी गंगेत न्हाईल तेव्हा बघू, पण तोपर्यंत किमान महामंडळ तरी द्या, अशी आग्रही मागणी भाजपच्या (BJP) आमदारांकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आमदारांनी मागणी केलेल्या महामंडळामध्ये सिडको, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, कोकण विकास महामंडळ, वस्त्रोद्योग महामंडळ अशा विविध महामंडळांचा समावेश आहे. (BJP MLAs have […]
जालना : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, अंतरवाली सराटी येथे पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार राजेश टोपे यांनी रचला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर टोपे यांची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली आहे. (conspiracy to stone-pelt the police at Antarwali Sarati […]
नांदेड : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटनेत डीनवर कारवाई नाही आणि नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांची जात पाहून त्यांना घरी बसवलं असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या आरोपांनी शिंदे सरकार अडचणीत येण्याची […]
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आधी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रुग्णालयांमधील रुग्णांचे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाच आता त्यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी “भाजपमध्ये काही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी […]
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी बोलविल्यास त्यांच्यासोबत जायला एका पायावर तयार आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी पुन्हा एका साद घातली. ते महाराष्ट्र टाईम्स या माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यामुळे आता आगामी काळात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन औवेसी हे एकत्र दिसणार का असा […]
पुणे : पालकमंत्रीपद गेले असले तरी काळजी करु नका. भाजपच्या (BJP) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. कायद्यानुसार मी सहपालकमंत्री आहे, त्यामुळे या पुढील काळातही पुण्यातील विकासकामांचा आढावा घेणे सुरूच ठेवणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. पालकमंत्रीपदावरुन हटविल्यानंतर शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते बोलत […]
मुंबई : बारामती ॲग्रोमधील औद्याोगिक प्रकल्पाकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याबाबतचे पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. मात्र, या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले असून 16 ऑक्टोबरपर्यंत बारामती ॲग्रोला दिलेला […]
पुणे : मावळते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (5 ऑक्टोबर) चार्ज सोडण्यापूर्वी पुण्याची धावती आढावा बैठक घेतली. या बैठकीचे नेमके इतिवृत्त अद्याप समजू शकले नसले तरी यावेळी पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भाजप, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मंजूर कामांबाबत विचारणा केल्याची चर्चा आहे. या कामांचे इतिवृत्त तयार होऊनही त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. परिणामी […]
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 46 वर गेली आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषध टंचाईमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशात आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात […]
नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) आणखी एक मित्र गमावला आहे. आंध्रप्रदेशमधील जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची आणि तेलगू देसम पक्षाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. “आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आणि आंध्र प्रदेशमध्ये सुशासन आणण्यासाठी जनसेना आणि तेलगू देसम पक्षाची गरज आहे” असे मत […]