मुंबई : घरी अठरा विश्व दारिद्र्य, वीज नाही, घड्याळ नाही, पुरेसे कपडे नाहीत, एक डोळा निकामी अशात सात भावंडं. अशा डोंगराएवढ्या संकटांवर मात करत दगडफोड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत मागास अशा वडार समाजातून येत सोलापूरचे बालामी मंजुळे (Balaji Manjule) आयएएस (IAS) झाले. अवघ्या महाराष्ट्राचे हिरो ठरले. आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये काम करताना महाराष्ट्राचा झेंडा सतत फडकवत ठेवला. […]
मुंबई : विधानपरिषदेचा कोकण पदवीधर मतदासंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1988 पासून 2012 सालचा एक अपवाद वगळता आजपर्यंत भाजपने मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. सध्या भाजपचे निरंजन डावखरे या मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेही दावा केला आहे, सोबतच मतदार नोंदणी मोहिमही हाती घेतली आहे. याशिवाय अजितदादांच्या गटातून माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. बारामती लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भोर, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी भोर विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अवघे 15 पदाधिकारी उपस्थित […]
जालना : मराठा समाजाला आता आरक्षण मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी गावा गावातल्या, तालुक्यात तालुक्यातल्या, जिल्ह्यात जिल्ह्यातल्या मराठ्यांनो सगळे सावध राहा. कोणीही शांत बसू नका. आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही. मराठा आता एकजूट झाला आहे. आपल्या फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. हे छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे कशामुळे बोलतात माहित आहे का? यांना […]
पुणे : “पालकमंत्रीपद गेले म्हणून नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे, बारामती जिंकण्यासाठीच ही तडजोड केली आहे”, असे विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. मात्र त्यांच्या या विधानामुळे अजितदादा पुण्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेऊन आगामी काळात बारामती भाजपला जिंकवून […]
नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये आज (14 ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची भव्य जाहीर सभा पार पडत आहे. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातून महत्वाची अपडेट समोर येत आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून […]
तुळजापूर : सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवास येत्या 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आय. के. मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत कार्यरत […]
विष्णू सानप पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार अश्विनी जगताप चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. “मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, माझ्या नादी लागू नका. पाठीमागून वार करू नका”, अशा शब्दात भाजप शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांना त्यांनी खडसावले. (BJP MLA Ashwini Jagtap got angry at the press […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. भोसले यांच्या पत्नी, माजी नगरसेविका रेश्मा भोसले आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पुण्यात भेट नाकारली. यामुळे तुरुंगातून ससूनला पुन्हा उपचारासाठी हलविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Former NCP MLA Anil Bhosle’s wife, former corporator Reshma Bhosle […]
नवी दिल्ली : “आमदार अपात्रता सुनावणीचा पोरखेळ सुरु आहे”, अशा अत्यंत कडक शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. शिवाय यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रक न्यायालयाने फेटाळले असून येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता सुनावणीसाठी नवीन रुपरेषा देण्याचे निर्देशही न्यायालयाने नार्वेकरांना […]