आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने् कंबर कसली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीच भाजपने 39 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. याशिवाय आता भाजपने इतर राज्यातील आमदारांना या निवडणुकीच्या कामासाठी मध्यप्रदेशात पाठविले आहे. भाजपने महाराष्ट्रातील आणि बिहारमधील आमदारांना मध्यप्रदेश […]
मुंबई : महिलेला धक्का लागल्याने झालेल्या मारहाणीत तरुणाला रेल्वे खाली जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारी घटना नुकतीच घडली. त्यानंतर आता घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यानंतर संबंधित तरुणाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बघ्यांची भूमिका घेणाऱ्या प्रवाशांबद्दलही चीड व्यक्त केली जात आहे. (A video of a shocking and disturbing […]
मुंबई : पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहे, त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यामागे ताकद उभी करा असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मुंबईत ठाकरे गटाची लोकसभा निवडणूक आणि पक्षबांधणीच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी याबाबतचे आदेश दिले. (Uddhav […]
पुणे : गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीमागील नेमके कारण काय हे समोर येत नव्हते. त्यामुले माध्यमांनी आणि लोकांनी वेगवेगळ्या कारणांचा अंदाज बांधला. पण ही भेट नक्की कशासाठी झाली याचे कारण आता समोर […]
बीड : स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्याप्रमाणेच त्यांच्या नातवानेही निष्ठेच्या बाबतीत तडजोड केलेली नाही, याचा मला आनंद आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते बीड येथील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी सभेची तयारी पाहुनही पवार यांनी आमदार क्षीरसागर यांच्या कष्टाचे कौतुक केले. तसंच त्यांना […]
धनंजय मुंडे, बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा. पण तेच अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यापाठोपाठ माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे हेही अजितदादांच्याच व्यासपीठावर जाऊन दाखल झाले. कधीकाळी फक्त ‘शरद पवार’ या नावाभोवती फिरणारा जिल्हा अचानकपणे अजित पवार यांच्या नावाभोवती फिरु लागला. यामुळे शरद पवार यांचे वलय […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये भव्य जाहीर सभा पार पडली. बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेक बडे नेते, आजी, माजी आमदार पवारांच्या या सभेसाठी उपस्थित होते. पवारांच्या सभेसाठी बीडसह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत सभा यशस्वी […]
बीड : “ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, ज्यांच्याकडून तुम्हाला आयुष्यात मदत झाली असेल, त्यांच्याबद्दल थोडी तरी माणुसकी दाखवा, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित (Amar Singh Pandit) यांना अत्यंत कडक शब्दात फटकारलं. ते बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. “साहेबांचे वय झाले”, असं म्हणतं अमरसिंह पंडित यांनी सहकाऱ्यांना पक्ष […]
बीड : येथे आज (17 ऑगस्ट) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला जिल्ह्यास राज्यातील अनेक नेते उपस्थित आहेत. मात्र याच सभेकडे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली आहे. कोल्हे का अनुपस्थित राहिले, यामागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण या निमित्ताने कोल्हे यांनी मुंडेंसोबतच्या जुन्या […]
मुंबई : तिकीट बुकिंग करुन प्रवाशाला उरलेले 6 रुपये परत न देणे, तिकीट क्लर्कला चांगलेच महागात पडले आहे. तब्बल 26 वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरलेल्या क्लर्क राजेश वर्मा यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मुंबई उच्च न्यायलायनेही त्यांना या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. (railway employee was fired for not returning the remaining Rs 6 […]