शिर्डी : “काही लोक सांगतात की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, पण ती कशा करता? तर त्या खुर्चीच रक्षण करण्याकरता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तरी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करु”, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. “बीडच्या जनतेचा आशीर्वाद शरद पवारांच्या निष्ठावंतांसोबत असून आगामी निवडणुकीत शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांचे डिपॉझिट […]
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, राष्ट्रवादीला वगळून ठाकरे आणि काँग्रेस ‘प्लॅन बी’ तयार करत आहेत, पण अशा केवळ चर्चाच आहेत. यात वस्तूस्थिती नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. उद्याच्या बीडमधील सभेपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशांतील विविध राजकीय विषयांवरही सविस्तर भाष्य […]
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगात जे उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thckeray) झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते. कारण सध्या निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही, पण निवडणूक आयोगाने स्वतः निर्णय घेतला तर मला चिंता नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या नावाची आणि चिन्हाबद्दलची भीती व्यक्त केली, ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत […]
नागपूर : येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश उके (Satish Ukey) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उकेंसह आणखी सहा जणांवरही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीची बाभुळखेडा येथील सिलिंगची 1 एकर जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Nagpur-based lawyer and […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अजितदादांचाही […]
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पिपली बुरगी येथील बहुप्रतिक्षित क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय विविध विकास कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीसांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच शासन अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील पिपली बुरगी […]
लातूर : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अभिमन्यू पवार यांच्याशिवाय पक्षश्रेष्ठींसमोर दुसरे नावच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही आमदार पवार यांच्यावर कृपा आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार आणि कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी खळबळ उडवून दिली आहे. पटेल यांच्या या दाव्यानंतर आता माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीच्या चर्चा अद्याप कायम आहेत. अशात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांना फोन करुन पवारांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील जाणून घेतला असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी फोनवरुन या गुप्त बैठकीबाबत चर्चा केली. (Union Home Minister […]
मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. याच प्लॅनचा भाग म्हणून काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने एका […]