लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये राजभवन आणि उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या घरासमोरच एका महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिला रिक्षाने रुग्णालयात जात होती. यादरम्यान, तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिला. मात्र जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला. या […]
नवी दिल्ली : असूर आणि मिर्झापूर या वेब सिरीज बघून दरोडा आणि दुहेरी हत्याकांड केलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. मेरठ पोलिसांनी अवघ्या दीड दिवसांत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. हे दोन्ही आरोपी जवळपास 3 वर्षांपासून दरोड्याचे प्लॅनिंग करत होते. विशेष म्हणजे यातील एक आरोपी वकिलीचे शिक्षण घेत असलेला आहे. (Police arrested two accused […]
पुणे : सध्या राज्यभरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? काय चर्चा झाली असावी? काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादीही भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. अशात आता या भेटीमागे भगत पाटील यांचे […]
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनामागे राजकारण असू शकते. कारण ईडी, सीबीआय, एनआयए किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने त्यांच्या जामिनाला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट बरीच सूचक असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मलिक यांच्या जामिनावर संशय व्यक्त केला आहे. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याची माहिती समोर येत आहे. गत शुक्रवारीच (11 ऑगस्ट) त्यांना ईडीने ही नोटीस पाठविली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. याशिवाय अन्य 5 जणांनाही ईडी चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती आहे. भगत पाटील […]
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच एक धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 13 रुग्ण आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. याआधी पाच दिवसांपूर्वीच इथे एका रात्रीत 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपुऱ्या आरोग्य सुविधा, […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघे 6 ते 7 महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. याच तयारीचा भाग म्हणून केंद्रातील मोदी सरकारने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनच्या लाल किल्ल्यावरील विशेष कार्यक्रमात काही खास पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. देशभरातील तब्बल 1700 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. (Modi government has […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल (13 ऑगस्ट) गुप्त भेट झाल्याची सांगितलं जात आहे. पुण्यात कोरेगाव पार्कमधील प्रसिद्ध उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे. मात्र चोरडिया यांनी अशा प्रकारे कोणतीही भेट आणि बैठक झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मात्र कोरेगाव पार्क परिसरातील 73 नंबरच्या […]
नवी दिल्ली : जे स्वत:ला राम मनोहर लोहियांचे वारसदार ठरवतात, त्याच लोहियांनी नेहरू जाणूनबुजून ईशान्य भारताचा विकास करत नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे तो भाग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिला आहे. ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने (Congress) लक्ष दिले नाही. ईशान्य भारत आणि मणिपूरमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसच कारणीभूत आहे. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि पालकमंत्रीपदावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चांगलेच मान-अपमान नाट्य रंगलं आहे. अशातच येत्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणानिमित्ताने कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळणार, कोणाचे पारडे जड राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात विशेषतः नाशिक, रायगड, पुणे, जळगाव या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होत्या. […]