मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. कालच्या बंडानंतर आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून अनिल पाटील […]
NCP Political Crises : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवगंत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचे सांगितले. यानंतर साताऱ्यात बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्याविषयी माहिती दिली. (Sharad […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी अजितदादांचा हात धरत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. यात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील आघाडीवर होते. ते अजित पवार यांच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काहीही न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, कालच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी घुमजाव करत ‘मी […]
मुंबई : दहशतवाद्यांशी व्यवहार आणि मनी लॉंड्रिंग केल्याच्या आरोपांमध्ये तुरुंगात असलेल्या नबाम मलिक यांचा पाठिंबा शिंदे-फडणवीस सरकार घेणार का असा सवाल सध्या विचारला जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील अनेक समीकरण बदलली आहे. राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. तर 12 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. या आमदारांशिवाय 8 आमदार […]
NCP : कराड : राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादीत जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लढाईचे रणशिंग फुंकलं. ते कराड येथील प्रितीसंगममधून बोलत होते. अजित पवार यांच्या बंडानंतर आज गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शरद पवार यांनी कराड येथे जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांना 24 तासांच्या आत पहिला धक्का बसला आहे. काल पर्यंत अजित पवार यांच्यासोबत असलेले वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे आज शरद पवार यांच्या गाडीत बसलेले दिसून आले. मकरंद पाटील यांना घेऊनच ते कराड येथील प्रितीसंगमकडे रवाना झाले. प्रितीसंगम येथे आज शरद पवार दिवंगत […]
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा देत थेट शिंदे सरकारमध्ये एन्ट्री घेतली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकावले आहे. तब्बल 40 आमदारांना घेऊन अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आज (2 जुलै) त्यांचा तातडीने शपथविधी होत आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदार मंत्रिपदाचे शपथ घेणार आहेत. यात छगन भुजबळ, दिलीप […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. इथे ते त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुकंप होण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ हे भाजपसोबत जाण्याची शक्यता असून या दोघांसह शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी येत्या 6 जुलैला होण्याची शक्यता आहे. (NCP leader Ajit Pawar and […]