दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत आज (6 जुलै) ही बैठक पार पडत आहे. मात्र अजित पवार यांच्यावतीने या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 30 जूनच्या बैठकीत निवड बहुमताने त्यांची निवड […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील […]
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडाने शिंदेंची शिवसेना (Shivsena) कमालीची अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नाराज आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीत मंत्रिपदावरुन चर्चा सुरु असताना, अचानक काही आमदार एकमेकांना भिडले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर मंत्रिपद मिळत नसल्याने ही अस्वस्थता इतकी […]
मुंबई : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानाचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार नाराज असून त्यांना ठाकरेंकडे परतीचे वेध लागले आहेत अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदेंच्या शिवसेना आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिंदेंच्या राजीनाम्याची अफवा, बंडातील नैतिकता, अजितदादांवरील निधीचे आरोप, मंत्रिपदाची घटलेली संख्या आणि मतदारसंघांची चिंता असे अनेक प्रश्न अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदेंच्या शिवसेना आमदारांच्या पुढे उभे राहिले आहेत. या सगळ्या नाराजीची मंगळवारी (4 जुलै) शिवसेना आमदारांनी आणि मंत्र्यांनी मंत्रालयातच […]
मुंबई : तुमच्यावर पवार साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. तुम्हाला काय कमी केलं होतं? अजून काय पाहिजे होतं? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटील यांना जाब विचारला.शरद पवार यांनी आजपर्यंत दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या सर्व पदांची माहिती देत एक ट्विटर पोस्ट केली आहे. यात त्यांनी वळसे पाटील यांना […]
मुंबई : बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आक्रमक भाषण झाले. तब्बल 25 वर्षांपासूनची साचून राहिलेली खदखद या भाषणातून बाहेर निघाली. याच भाषणातून अजित पवार यांनी आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासोबतच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसविण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र यावेळी बोलताना अजित पवार यांनी केलेल्या दोन दाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे टेन्शन चांगलेच वाढले असल्याचे चित्र […]
मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडाचं भवितव्य आता 3 आमदारांच्या हाती आहे. आतापर्यंत 53 पैकी 50 आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात 50 पैकी अजित पवार यांच्या गोटात त्यांच्यासह 32 आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या बाजूने 18 आमदार आहेत. मात्र तीन जणांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. यात तुरुंगात असलेले अणुशक्तीनगरचे आमदार नवाब […]
NCP : मुंबई : शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक पवार हे अजित पवार यांचा उजवा हात समजले जात होते. रविवारी (2 जुलै) अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा अशोक पवार […]
मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवगंत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचं सांगितलं. यानंतर आता शरद पवार बंडखोरांना जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर […]