अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरण घडले असल्याचा दावा भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी केला आहे. कर्जतमधील दुरगाव येथील आझीम अकील शेख याने एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले आहे, असे ट्विट करत सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, कर्जत पोलिसांकडे दाद […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, “या अपघाताची चौकशी होईल. चौकशी नंतर खरे कारण समोर येईल अशी अपेक्षा करू या. पण या अपघातामुळे रेल्वेला भेडसावणाऱ्या मोठ्या समस्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यात वंदे भारत ट्रेनचा सरसकट अट्टहास […]
बीड : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते. या दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे, राजकारणाचे भाग वेगळे, राजकारणाच्या पद्धती वेगळ्या. पण या दोघांमध्ये एक समान धागा तो म्हणजे भाजपवरील नाराजी. एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज असलेले आणि पक्ष सोडलेले नेते. तर पंकजा मुंडे भाजपवर नाराज असलेल्या पण सध्या संयम धरुन पक्षातच राहिलेल्या नेत्या. […]
कोल्हापूर : सध्या शिवसेना (UBT) कडे असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ताजा असतानाच आता काँग्रेसनेही दोन्ही जागांसाठी फिल्डिंग लावली आहे. “ज्या जागा आता आमच्याकडे नाहीत पण आमची शक्ती तिथं आहे, अशा जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी चर्चा करणार आहे. जिल्हातील आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथे काँग्रेसची ताकद आहे”, असं म्हणतं काँग्रेस नेते […]
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. भगीरथ भालकेंना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेल्या आणि विस्तारत असलेल्या पक्षाची ऑफर आहे. विधानसभेची उमेदवारी आणि पक्षाची जबाबदारी अशी ऑफर […]
मुंबई : भाजपसोडून राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या अन् आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी परत पक्षात यावं असं म्हणतं भाजपचे (BJP) नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीत विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खडसेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तावडे बोलत होते. भाजपाचे काही दुखावलेले, नाराज झालेले नेते वैयक्तितरित्या तुमच्याशी बोलतात का? […]
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले होते. कारखान्याचं आणि शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून यातून चांगला पायंडा पडेल, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे […]
राज्य सरकारने शुक्रवारी 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या. यात महिन्याभरापूर्वीच पोस्टिंग मिळालेले अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभारच स्वीकारला नव्हता. आता तेथून पुन्हा महिन्याभरात त्यांची बदली झाली आहे. मुंडे यांची बदली आता मराठी […]
Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर प्रत्यक्षात […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक काम करत आहेत, याची खात्री पटल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली, असं म्हणतं मंत्री उदय सामंत यांनी शिंदे-पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली. ते रायगड येथे बोलत होते. काल (गुरुवार) शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली. राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच पवार यांनी शिंदे […]