मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी आता ‘मे’ महिन्यापर्यंतची वाट पहावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे हा विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प […]
पुणे : ससून रुग्णालयाशेजारी नवीन, सुसज्ज आणि अद्ययावत असे स्वतंत्र कर्करोग (Cancer Hospital) रुग्णालय उभारण्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काल (शुक्रवारी) केली. शिवाय रुग्णालयासाठी ससूनशेजारील जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना केली. मात्र, अजितदादांची पाठ वळताच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी या रुग्णालयाची […]
राज्यातील शेवटच्या क्रमांकाचा पण सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. कारण राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः किंवा त्यांचे पुत्र प्रतिक पाटील इथून लढणार असल्याच्या चर्चा होत्या. आता होत्या का? तर काँग्रेसच्या सतेज पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी राजू शेट्टी यांना जवळपास महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल करुन घेतले आहे. शेट्टी महाविकास […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलने त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची राज्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे. (Rashmi Shukla, the […]
कोल्हापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या भेटीवर आक्षेप घेऊन टीका केली होती. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मला नको पण सामन्य शिवसैनिकाला उमेदवारी […]
रांची : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते (Jharkhand Mukti Morcha) आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) हे राजीनाम्याच्या तयारीत आहे. नुकतेच ईडीकडून त्यांना जमीन घोटाळ्याच्या आरोपात सातवे आणि अखेरचे समन्स पाठविण्यात आले होते. मात्र या समन्सलाही ते चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही? अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रश्नाचा अखेर खटका पडणार आहे. येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) या संबंधीचा निर्णय देणार आहेत. जर शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर राजकीय संकेतांनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे एक […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने (BJP) केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्या नेतृत्तात एका ‘आठ सदस्यीय’ समितीची स्थापना केली आहे. निवडणुकीपुरते पक्षात येणाऱ्या आयारामांना चाप बसविण्यासाठी आणि इतर पक्षातील कोणते नेते आपल्या पक्षात येऊ शकतात, पक्षाच्या साच्यात फिट बसू शकतात अशा चेहऱ्यांचा शोध घेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. (BJP has […]
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) नोटीस बजावली आहे. तब्बल दोन हजार कर्मचाऱ्यांच्या जबरदस्तीने बदल्या केल्याचा आरोप टीसीएसवर करण्यात आला आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट या कामगार संघटनेच्या तक्रारीनंतर कामगार विभागने ही नोटीस बजावली आहे. ही संघटना IT/ITeS आणि संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम […]
रांची : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) राजीनाम्याच्या तयारीत आहे. ईडीकडून त्यांना जमीन घोटाळ्याच्या आरोपत सातवे आणि अखरचे समन्स पाठविण्यात आले होते. मात्र या समन्सलाही ते चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ते राजीनामा देण्याच्या तयारीत […]