मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात तुमच्या-आमच्या एलआयसीला शिंदे सरकारने मोठा झटका दिला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी राज्य कर उपायुक्त यांनी एलआयसीला तब्बल 806 कोटींची नोटीस पाठविली आहे. नोटिशीनुसार, 365.02 कोटी रुपये जीएसटी, 404.07 कोटी रुपयांचा दंड आणि 36.05 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या मुदतीत मुंबईतील अपील आयुक्त यांच्याकडे या आदेशाविरुद्ध अपील […]
पुणे : एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीच्या गेटवर जोरदार राडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी परिसरात काल (31 डिसेंबर) ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) संबंधित मुलीला काही काळ ताब्यात घेतले, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई न करता काही वेळात सोडूनही दिले. ती पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानेच कोणतीही कारवाई न केल्याच आरोप […]
मुंबई : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार की नाही याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मागील अनेक दिवसांपासून केली आहे. त्यांनी चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवण्याचे सूत्रही दिले आहे. मात्र अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत (MVA) प्रवेश होऊ शकलेला नाही. अखेरीस असा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) […]
अमरावती : वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा आणि वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे प्रमुख, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांची बहीण वायएस शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या आठवड्यात त्यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती. काँग्रेसकडून शर्मिला यांना येत्या लोकसभा आणि […]
मुंबई : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या (Shree Ram Mandir) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने […]
I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीतून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीचे नवे समन्वयक होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचं (Congress) पुढाकार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीतील जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री नितीश यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर […]
नवी दिल्ली : यंदाचे वर्ष हे जगभरात ‘मतदार राजाचे’ वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. कारण यावर्षी भारतासह (India) जगभरातील तब्बल 78 देशांमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भारतात येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय भारताचे शेजारी बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानमध्येही (Pakistan) यावर्षी निवडणुका होणार आहेत. परंतु हे निवडणुकीचे वारे केवळ आशियापुरतेच मर्यादित नाही. आशियासोबतच […]
नवी दिल्ली : मागील 10 वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘जन मन सर्वे’ची सुरुवात केली आहे. देशावासियांना नमो ॲपवरती या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. नमो ॲप’ (Namo App) हे पंतप्रधान मोदींचे जनतेशी थेट संवाद साधण्याचे आणि जनतेचा सल्ला ऐकण्याचे एक चांगले माध्यम […]
अहमदनगर : महापालिकेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सध्या तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा विचार करू नका. आता आधी आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मग आम्ही तुम्हाला मदत करु, असे आवाहन करत माजी आमदार, भाजप (BJP) नेते शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी माजी नगरसेवकांना येत्या विधानसभा निवडणुकीतील विजयसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. (BJP […]
IIT-BHU मधील विद्यार्थिनीवरील सामूहिक विनयभंग प्रकरणात तीन आरोपींची भारतीय जनता पक्षातून (BJP) हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख हंसराज विश्वकर्मा (Hansraj Vishwakarma) यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. कुणाल पांडे, आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल या तिन्ही आरोपींना काल (31 डिसेंबर) अटक केली. त्यानंतर हे तिघेही जण भाजपचे पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. […]