नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या (6 डिसेंबर) काँग्रेसच्या (Congress) वतीने आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया’ (India) आघाडी बैठक रद्द करण्यात आली आहे. आता ही बैठक 18 किंवा 19 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी देशभरातील बडे नेते सहभागी होणार होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे […]
नवी दिल्ली : भारतात रस्ते अपघातात (Road accidents) बहुतांश मृत्यू हे उपचाराला उशीर झाल्यामुळे होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता हीच गंभीर बाब लक्षात घेऊन मोदी सरकार (Modi Government) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना संपूर्ण देशभरात मोफत उपचाराची सुविधा लागू करणार आहे. अपघातानंतर तातडीने आणि चांगले उपचार मिळावे, यासाठी ही व्यवस्था केली जाणार आहे. रस्ते […]
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगात सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Niragude) हेच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यापूर्वी असाच आरोप करत आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. शिंदे सरकारमधील (Shinde Government) दोन मंत्री आणि माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा कामकाजात हस्तक्षेप होत आहे, एका विशिष्ट प्रकारची […]
भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने (Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना […]
लोकसभेची सेमी फायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस सत्तेत आली. या निकालानंतर देशात 9 वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) करिष्मा कायम असल्याचा दावा भाजपकडून (BJP) केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक देखील भाजप मोदींच्या चेहऱ्यावर […]
सातारा : सह्याद्रीच्या खोऱ्यात पाटण तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शिंदे सरकारने (Shinde government) मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (4 डिसेंबर) प्रसिद्ध करण्यात आला. मागील काही वर्षांपासून सातारा आणि चिपळूण भागात अतिवृष्टीमुळे सातत्याने येणाऱ्या महापूरामुळे इथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या केंद्राची आवश्यकता निर्माण झाली होती. पाटण तालुका […]
सिंधुदुर्ग : नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची राजमुद्रा असणार आहे. शिवाय भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार आहे, अशा दोन मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्या. आज (4 डिसेंबर) नौदल दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या […]
हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटले जाणारे रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काल (3 डिसेंबर) निकाल लागल्यानंतरच रेड्डी यांच्या नावाची चर्चा होती. आज (4 डिसेंबर) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, आज रात्री आठ वाजता रेड्डी यांचा राजभवनात शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. […]
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (4 डिसेंबर) कोकण दौऱ्यावर आहेत. नौदल दिनानिमित्त ते या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या आगमानापूर्वीच दौऱ्याच्या खर्चावरुन कोकणात वादळ आले आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हेलिपॅडवर तब्बल दोन कोटी 28 लाख रुपयांची उधळपट्टी झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. तसेच […]
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) मदत केल्याप्रकरणी येरवडा कारागृहाच्या डॉक्टरलाच अटक करण्यात आली आहे. येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी संजय मरसाळे यांना अटक केली आहे. किरकोळ कारणासाठीही ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्याची शिफारस मरसाळेंनी केली होती, अशी माहिती चौकशीत समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी हेच कैद्याला […]