अहमदनगर : वय वर्ष अवघे 18, गरोदरपणाचा सातवा महिना, बाळाची अवस्था अत्यंत नाजूक, आईला जागेवरुन हलताही येत नव्हते… अन् अशात प्रसवकळा सुरु झाल्या. अशा या अवघडलेल्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत अहमदनगरमधील (Ahmednagar) एका आई आणि बाळासाठी ‘डायल 108’ रुग्णवाहिका (‘108’ Ambulance) देवदूत ठरली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी संबंधित युवतीची अत्यंत जोखमीची प्रसुती घरीच यशस्वी केली. प्रसुतीनंतर आई […]
छत्रपती संभाजीगर : भारतीय वंशाच्या समीर शाह (Sameer Shah) यांची बीबीसी अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC Media) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीबीसी ही ब्रिटन सरकारच्या मालकीची जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरातील विविध देशांमध्ये या संस्थेच्या कामाचे जाळे पसरले आहे. समीर शाह हे बीबीसीमध्ये सध्या ज्युनिपर कम्युनिकेशनचे सीईओ आहेत. अध्यक्ष म्हणून पदभार […]
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या ड्रग्जच्य प्रकरणाने आणि ससूनमधून पळून जाण्याच्या घडामोडीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. तब्बल 15 दिवस ललित पाटील पुणे पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड बनला होता. पोलिसांच्या डोळ्यासमोरून पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. राजकारणी, पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील हितसंबंधांचे आरोप झाले. या सगळ्या घडामोडींमुळे पुणे पोलीस ललित पाटीलल […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयाने आज (7 डिसेंबर) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खिंडीत गाठत त्यांनीच ज्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आणि दाऊद इब्राहिमसोबत व्यवहार केल्याच्या आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी […]
हैदराबाद : तेलंगणातील (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटल्या जाणाऱ्या रेवंथ रेड्डी यांनी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यासोबतच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Revanth Reddy took oath as the new Chief Minister of Telangana) असे […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नेमके कोणाच्या बाजूने उभे राहणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मलिक सत्ताधारी रांगेत शेवटच्या बाकावर बसलेले दिसून आले. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) की उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या प्रश्नावर आता स्वतः मलिक यांनीच उत्तर दिले आहे. […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांच्याकडून खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, असा आरोप असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केला आहे. तसेच चांदेरे यांना बडतर्फ करावे अशीही मागणी कीर्तिकर यांनी असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना कोचिंग संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचा जाहिरात व्यवहार ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. ग्राहक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पत्र लिहून हा निर्णय लागू करण्याची विनंती केली आहे. या जाहिरातींचा वापर संभाव्य विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर हा […]
राजस्थानमध्ये मतदारांनी परंपरेप्रमाणे सत्ताबदल करत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. 199 पैकी 115 जागा जिंकत भाजपने (BJP) पूर्ण बहुमत मिळविले. त्यामुळे आता पाच वर्षे राजस्थानमध्ये भाजप ‘राज’ असणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे राज कोणाच्या नेतृत्वात असणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. (BJP […]
नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेविरुद्धची सुनावणी पूर्ण झाली असून याबाबतचा निकाल आज (6 डिसेंबर) संध्याकाळपर्यंत येऊ शकतो, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायायल नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे […]