हसन : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून सिद्धरामय्यांचे सरकार (siddharamaiah government)कधीही पडू शकते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, त्याच स्थितीचा सामना कर्नाटकात काँग्रेस पक्षाला करावा लागू शकतो, असे खबळजनक दावे जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केले आहेत. हसनमध्ये पत्रकारांना संबोधित करताना ते […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]
मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. […]
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची भारतीय जनता पक्षाने (BJP) तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मुंबई आणि नागपूरमध्ये पक्षाच्या दोन महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार […]
नवी दिल्ली : देशातील ट्रकची खराब स्थिती आणि प्रवासादरम्यान ट्रक ड्रायव्हर्सची होणारी दयनीय अवस्था पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2025 पासून सर्व ट्रक्समध्ये एसी केबिन अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करुन याबाबतची माहिती दिली. (All N2 and N3 category trucks manufactured after 1 October 2025 will be […]
लखनऊ : कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाज पक्षाची धुरा आता 28 वर्षीय आकाश आनंद यांच्या हातात असणार आहे. पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आकाश आनंद यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. रविवारी (10 डिसेंबर) बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मायावतींनी ही मोठी केली. मागील काही दिवसांपासून त्या प्रकृती […]
रायपूर : गत सात दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या नावावरुन सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला असून विष्णू देव साय (Vishnu Dev Sai) हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. रमणसिंह, विजय बघेल, अरुण साव, ओ. पी. चौधरी या सर्व चर्चेतील नावांना बाजूला सारुन भाजपने धक्कातंत्राचा वापर करत आश्चर्यकारकरित्या साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. भाजपच्या (BJP) विधिमंडळ बैठकीत त्यांची विधिमंडळ […]
मुंबई : सोयाबीन-कापसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ दिवसांची मुदत असून. यावेळेत सरकारने निर्णय न घेतल्यास 15 डिसेंबरनंतर राज्यात आंदोलनाचा स्फोट होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शिंदे सरकारला दिला आहे. सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या तापलेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत रविकांत […]
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद (Akash Anand) यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. रविवारी (10 डिसेंबर) बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सभेत मायावतींनी ही मोठी केली. मायावती मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे सार्वजनिक […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या 10 ठिकाणांवर 6 डिसेंबर रोजी आयकर विभागाने छापे टाकले. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड आणि 3 बॅग भरुन सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली आहे. यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांनी यावर ट्विट करत म्हटले […]