दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘भारत पे’चे सहसंस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘भारत पे’ बद्दल अवमानकारक पोस्ट शेअर केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे ग्रोव्हर यांनी माफी मागूनही न्यायालयाने कठोर पाऊल उचलले आहे, शिवाय यापुढे ‘भारत पे’बद्दल कोणतेही अवमानकारक विधान न करण्याची तंबीही […]
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट होल मायनिंग (rat hole mining) या पद्धतीने तब्बल 17 दिवसांनंतर या मजुरांना बाहेर काढण्यात आले. एकूण 58 मीटर खोदकाम करुन त्यात 800 मीमी व्यासाचा पाईप टाकून मजुरांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. या मजुरांच्या सुखरुप सुटकेनंतर संपूर्ण देशातून […]
पुणे : राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या […]
हैदराबाद : “राहुल गांधी, बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्ही आता पन्नाशी ओलांडली आहे, एकटेपणा तुम्हाला त्रास देत असेल, त्यामुळे कोणीतरी जोडीदार शोधा, हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला त्रास दिला तर आम्हीही सोडणार नाही, असा इशारा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी […]
दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेत दोन मॅच जिंकत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नुकताच वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला सलग 2 पराभव पाहायला लागल्याने मोठी नामुष्की ओढावली होती. यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने उर्वरित मॅचेससाठी टीममध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे सात खेळाडू T20 मालिकेसाठी भारतातच थांबले होते. मात्र यातील सहा खेळाडूंना […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 10 शिलेदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दहा नेत्यांची महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आमदार रवींद्र वायकर, सुनिल प्रभू आणि भास्कर […]
सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदे पाकीट पोहचविणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे, निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पण यातून शिंदे हे पोहचविणाऱ्यांपैकी एक आहेत, असे म्हणत नारायण राणे […]
ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा मराठी चित्रपट मे 2022 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या (Dharamveer 2) शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या सिनेमाच्या पहिला भागाला मिळालेल्या यशानंतर निर्माते मंगेश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 10 शिलेदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह 10 नेत्यांवर विभागवार बांधणीची आणि लोकसभा (Loksabha) मतदारसंघात शिवसेनेच्या विजयासाठीची जबाबदारी देण्यात आली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) group has given the responsibility of 42 constituencies to 10 Leaders) यात […]
जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 75.45 टक्के इतके बंपर मतदान झाले आहे. यानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत अंदाज बांधले जात आहेत, दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोणाचे सरकार येणार याचे उत्तर येत्या 3 डिसेंबरलाच निकालातून समोर येईल. पण राजस्थानमध्ये (Rajsthan) झालेले बंपर मतदान कोणासाठी फायदेशीर आणि कोणासाठी नुकसानकारक ठरणार? असाही सवाल विचारला जात आहे. कारण […]