- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
संभाजी भिडेंचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार, AIMIM नेत्याचं विधान
सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या मिशाच नव्हे तर पायही कापणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान सोलापुरातील एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. भिडे यांची पोलिस सुरक्षा काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, मग त्यांचे जे करायचं ते आम्ही करू, असेही जहाल विधान करण्यात आले […]
-
Crane Accident on Samriddhi : 304 अन्वये गुन्हा दाखल, दोषींवर कारवाई करणारच; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Crane Accident on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मध्यरात्री क्रेन पडून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मृत कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून दोषींवर कारवाई […]
-
धुळ्यात डिझेलचा ट्रक उलटला, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांची डिझेल लुटायला झुंबड
धुळे : धुळे शहरापासून काही अंतरावर डिझेलचा टँकर (Diesel tanker) भर रस्त्यात उलटला. त्यामुळं सर्व डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहून रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. उलटलेल्या डिझेल टँकरमधून सांडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. परिसरातील नागरिकांनी जे काही भांडं मिळेल, त्यात डिझेल भरण्यास सुरुवात केली. (In dhule The […]
-
बिहारमध्ये पुन्हा जातनिहाय जनगणना होणार, पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाचा बिहार सरकारला दिलासा
पाटणा : बिहारमधील जात जनगणनेबाबत ( Caste Census) पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) मोठा निर्णय दिला आहे. राज्यात जात जनगणना सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. बिहारमधील जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणावर बंदी घालण्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बिहारच्या नितीश कुमार सरकारसाठी ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळं आता बिहारमध्ये पुन्हा एकदा जातीवर […]
-
Manipur violence : सुप्रीम कोर्टाने मणिपूर पोलिसांना फटकारले, तुमच्या तपासाचा वेग संथपणे
Manipur violence : : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. काहीही केल्या हा हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात नुकतीच मणिपूर प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीत न्यायालयाने याप्रकरणी पोलीस प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले. कोर्टानं मणिपूरच्या पोलीस महासंचालकांना (Director General of Police) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत मणिपूरमधील परिस्थिती राज्यातील पोलिस प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर […]
-
PM Narendra Modi : “मेट्रो ही आधुनिक भारताची नवी लाईफलाईन, देशात 800 किमीपेक्षा जास्त मेट्रोचं नेटवर्क”
पुणे : भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावायचे असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचे (Public transport) आधुनिकीकरण केले पाहिजे. 2014 पर्यंत मेट्रोचे जाळे 250 किमीपेक्षा कमी होते. आता हे नेटवर्क देशात 800 किमीपेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये देशात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो (Metro) सेवा होती, आता 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रोचे […]
-
‘कॉंग्रेसने कलम 370 हे 70 वर्षे आपल्या मुलासारखं सांभाळलं; अमित शाहांची टीका
Amit Shah On Congress : 70 वर्षे देशाच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, त्यांनी फक्त कलम 370 हे 70 वर्ष स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. आज मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या ‘विजय संकल्प संमेलना’ला संबोधित करताना शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल […]
-
Shivendraraje : उदयनराजेंना आता स्वत:चा पराभव दिसतोय, म्हणून पायात साप सोडण्याचे उद्योग
सातारा : साताऱ्यात नव्याने स्थापन होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेच्या वादावरून काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आमनेसामने आले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी या जागेत असणारे बाजार समितीचे कंटेनर कार्यालय पोकलेन मशीनच्या साह्याने फोडले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने उदयनराजेंच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळेच आज पहिल्यांदा बाजार समितीच्यावतीने येथे […]
-
भिडेंनी पुन्हा गरळ ओकली, गांधीनंतर आता फुले अन साईंबाबांच्या xxx
Sambhaji Bhide On Mahatma Phule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंच्या अटकेची मागणी होऊ लागली. भिडेंवर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्याचे पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले होते. मात्र अद्यापही संभाजी […]
-
पाकिस्तानमध्ये पक्षाच्या बैठकीत भीषण स्फोट, प्रमुख नेत्यांसह 35 ठार
Bomb Blast Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्हात देशाला हादरवणारी एक घटना घडली आहे. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात मोठा बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. या स्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बैठकीला लक्ष्य करून हा स्फोट घडवला. पोलीस आणि स्थानिक नागरिक बचावकार्यात गुंतले […]








