कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पुणे : सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभेवर नियुक्ती केली. विधीमंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. याआधी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील निवड […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) मागण्यांसाठी आझाद मैदानावर आक्रमक आंदोलन करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि एसटी कामगारांचे आंदोलन निवळले होते. आता मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याने नाराजीचं वातावरण आहे. त्याबद्दल सदावर्ते यांनी ‘काऊंटडाऊन सुरु […]
मुंबई : शिवसेना फुटीनंतर आता कॉंग्रेसमध्ये नवा राजकीय अध्याय पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे, अशा […]
मुंबई : बीबीसी कार्यालयावर (BBC offices) आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीवरून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) जोरदार हल्लाबोल केला आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं? असे प्रकार वेळीच रोखले नाही तर देशात हुकुमशाही येण्यास वेळ लागणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बीबीसीवरील कारवाईचा […]
मुंबई : अदानी समूहाची (Adani Group) सर्वात मोठी कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने (Adani Enterprises) मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 च्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसने जबरदस्त कामगिरी नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 820 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्ष 2021 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला 11.63 कोटी रुपयांचा तोटा […]
नवी दिल्ली : बीबीसीच्या (BBC) कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. मुंबई आणि दिल्लीतील बीबीसी वृत्तसंथ्येच्या कार्यालयात प्राप्तिकर अधिकारी (Income Tax) अधिकारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी सुरु आहे. दरम्यान, या करावाईनंतर देशात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भारतात अघोषित आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केल्यानंर आता […]
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात (Karnataka Assembly Elections) चर्चा सुरु होती. तेव्हा एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने (जेडीएस) भाजपवर लावलेल्या घराणेशाहीच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं. कर्नाटक विधानसभेची मुदत २४ मे […]
विलिंगटन : न्यूझीलंडमध्ये आलेल्या गेब्रिएल चक्रीवादळामुळे (Cyclone Gabrielle) मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. देशात मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो घरांमध्ये वीज नाही. दरम्यान, न्यूझीलंडमधील भीषण विध्वंस पाहता, न्यूझीलंडला तिसऱ्यांदा देशात राष्ट्रीय आणीबाणी (National emergency) जाहीर करावी लागली आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स (New Zealand Prime Minister Chris Hipkins) […]
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यात काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर थोरात यांच्या राजीनामा नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही जायचे थोरातांनी मान्य केलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब थोरात संगमनेरला परतले. संगमनेरमध्ये येताच भर सभेत त्यांनी सत्यजित […]