नवी दिल्ली : रविवारी झालेल्या नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे. चौघांचीही एकमेकांशी घट्ट मैत्री होती. नेपाळ विमान अपघातात बळी गेलेले सोनू जैस्वाल, अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह यांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. त्यांच्या गावांमधील अंतर फक्त तीन किमी आहे. जहूराबाद बाजारपेठेला लागून असल्याने या सर्वांची येथे अनेकदा […]
हैदराबाद: हैदराबादचे शेवटचे निजाम उस्मान अली खान यांचे नातू निजाम मीर बरकत अली खान सिद्दीकी मुकर्रम जाह यांचे तुर्कीमध्ये निधन झाले आहे. ते हैदराबादचे आठवे निजाम होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपासून आजारी असलेले राजकुमार मुकर्रम जाह यांचे शनिवारी रात्री 10.30 वाजता निधन झाले. इस्तंबूल येथील त्यांच्या कार्यालयाने याबाबत […]
बारामती : “तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती,” असा जीवघेणा अनुभव विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. […]
सांगली : राज्यात पदवीधर निवडणुकीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास,विधी व न्याय,वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या परिक्षा आहेत.यामुळे तब्बल १० हजारांहून अधिक ‘पदवीधर’ निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहतील. या मुद्द्याकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. आमदार पडळकर यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहले […]
मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी रवाना झाले आहेत. या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. “या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन.” अशा शब्दात ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
पुणे : देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, सातासमुद्रापार देशाचा तिरंगा डौलाने फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे. खाशाबा जाधव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डुडलवर स्थान दिलं आहे. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारे स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिले मल्ल अशी खाशाबा जाधव यांची ख्याती आहे. ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांची […]
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्यामाजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध वरळी येथील गोमाता जनता एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर […]