केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना रेल्वेसाठी मोठी तरतूद केली. यंदाच्या अर्थसंकल्पात (Railway Budget) रेल्वेसाठी २. ४० लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. वर्ष २०१३ च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात ९ पटीने वाढ करण्यात आली. रेल्वे अर्थसंकल्पात राज्याकरिता १३ हजार ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली. यात मराठवाड्यासाठी […]
वर्धा : एखादी कथा किंवा एखादी कादंबरी यामुळे वादळ उठल्याचा आणि तिच्या लेखकांना प्रचंड मनस्ताप भोगाव्या लागल्याच्या घटना समाजात घडत आहेत. इतिहासाकडे निर्लेपदृष्टीने पहावयास अद्याप आम्ही तयार झालेलो नाही. काय प्रदर्शित करावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार लेखक, दिग्दर्शकाला असला पाहिजे, असे आवाहन 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष […]
राहुरी : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस. त्यामुळे दहाव्या दिवशी कृषी अभियंत्यांनी मुंडन करून राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेचा निषेध केला. कृषी अभियंत्यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू आहे. काल प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले होते तर आज कृषी अभियंत्यांनी मुंडन करून महाराष्ट्र राज्य […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लीटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षांची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने टाकीची दुरुस्ती केली. त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. पाणी प्रश्न मार्गी लागणार फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहेत. नगर […]
पुणे : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आता थंड झाली आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Agadi) दोन्ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लेट्सअपला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. जागा वाटपही झाले आहे. यानुसार कसब्याची जागा काँग्रेसकडे (Congress) आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे (Ncp) देण्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची […]
मुंबई : अमरावती पदवीधर मतदार संघात (Amravati Graduate Constituency) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी राज्यमंत्री रणजित पाटील (Ranjit Patil) पराभूत झाले आहेत. राज्यातील भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ असताना झालेला पराभव जिव्हारी लागणारा आहे. या निवडणुकीचे विश्लेषण म्हणजे रणजित पाटील यांचे मतदार आणि कार्यकर्त्याना गृहीत धरणे, विरोधी […]
मुंबई : नाशिकमध्ये काँग्रेसचे (Congress) घर फोडण्याचे पाप भाजपाने (BJP) केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करून नाही, अशी सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली. विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम […]
पुणे : २००४ साली खासदारकीच्या (MP Election) निवडणुकीत मी पैसे खर्च करुन संजय राऊतला निवडून आणले, असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला खुद्द नारायण राणे हेच उत्तर देतील. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष […]