मुंबई : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात ‘स्लिप बॉय’ असलेले संदिपान भुमरे ( Sandipan Bhumre) त्याच कारखान्याचे चेअरमन झाले. पाच वेळा निवडून येत त्यांनी आता कॅबिनेट मंत्रिपद मिळविले आहे. त्यांचा राजकीय प्रवास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील […]
कोल्हापूर : शिवसेना फूटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर सतत हल्लाबोल करत असतांना मिंधे गट असा शब्दप्रयोग वापरुन टीका करत असतात. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटात अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिंधे गट म्हणूनच टीका करत आहे. मात्र, यावर आजवर शिंदे गटाच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा आमदाराने, प्रवक्त्याने प्रतिउत्तर […]
पुणे : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मानव यांचा मुलगा हिंजवडी परिसरात असताना हा धमकीचा मेसेज आल्याने भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी कायद्या अंतर्गत सूर्यप्रताप नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागेश्वर […]
IND vs JAP Hockey Match: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक २०२३ (Match Wc २०२३) मध्ये आजपासून ( २६जानेवारी ) सामने सुरू होत आहेत. म्हणजेच जे संघ बाहेर पडले आहेत, (indian hockey team) त्यांच्यात आता चांगले स्थान मिळविण्यासाठी खेळी सुरु होणार आहे. आज ९ व्या ते १६ व्या स्थानासाठी एकूण ४ सामने खेळवले जाणार आहेत. विजयी […]
पुणे : “माझं जल्माचं गाव महुद बुद्रुक, गाव कराड-पंढरपूर रस्त्यावर हाय, गावाच्या आजूबाजूला मळ हायत, कासाळ वडा नदीसारखा हाय, अशी प्रभावी बोली भाषा, माणदेशी भाषा “माझ्या जलमाची चित्तरकथा” या मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र आपल्या आत्मकथनातून जागोजागी पेरणाऱ्या शांताबाई कृष्णाजी कांबळे (वय १०१) बुधवार (दि. २५) यांचे निधन झाले. शांताबाई कांबळे यांच्या याच आत्मकथनातून […]
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसणार आहेत. येत्या आठवड्यात डॉनल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा मेटाने केली आहे. कॅपिटल हिल (Capitol Hill) दंगलीनंतर ६ जानेवारी रोजी मेटाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे अकाउंट बंद करण्यात […]
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University) ते गणेशखिंड रस्त्यालगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेड्सची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे (PMRDA) उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) […]
“निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल.” अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. प्रजसत्ताक दिनानिमित्त “मूठभरांची जावो, प्रजेची […]
मुंबई : ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Shri Award ) यादी जाहीर करण्यात आली. यावेळी सुमारे १०६ जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. १९ पुरस्कारप्राप्त महिला आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते आणि ऑस्कर नामांकित गाण्याचे संगीतकार आणि गीतकार ‘नातू […]