मुंबई : शरद पवार हे आज देखील भाजपाबरोबर आहेत असा गौप्यस्फोट करुन प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ( Maharashtra Politics ) यावर राष्ट्रवादीकडून आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलं. […]
नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर साळुंखे यांच्याशी लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र या सरकरकडून २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2023 )घोषणा केली. विविध क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी डॉ. एस. एल भैरप्पा (S. L. Bhyrappa) हे देखील पद्मभूषण विजेत्यांपैकी एक आहेत. भैरप्पा हे कन्नड साहित्यकार असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या भारतीय भाषांमध्ये मोठ्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजांची छपाई सुरू झाल्याच्या निमित्ताने अर्थमंत्रालयात ‘हलवा समारंभ’ आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अर्थसंकल्पापूर्वी हलवा समारंभ साजरा करण्याची परंपरा आहे. […]
नवी दिल्ली : फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर अणूहल्ल्याच्या तयारीत होता, अशी माहिती तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी दिली होती, असा दावा पॉम्पीओ यांनी आपल्या एका पुस्तकात केला आहे. पॉम्पीओ यांच्या म्हणण्यानुसार सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की हे त्यावेळी भारत देखील आक्रमक प्रत्युत्तराची तयारी करत […]
पुणे : राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि आंध्र प्रदेशमधील ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) या पक्षाबरोबर मागील निवडणुकीत युती झाली होती. मात्र, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे जाहीरपणे आम्हाला १०० जागा हव्यात असे म्हणायचे. त्यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख ओवेसी पाठींबा द्यायचे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली. अल्पकाळातच ही युती तुटल्याने सर्वच जण […]
जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्या या कंपनीने सांगितले आहे की, कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली […]
अहमदनगर येथील कॉंग्रेस आमदार लहू कानडे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
नांदेड : तेलंगणातील सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची ही तेलंगणा (Telangana) बाहेर पहिलीच सभा असणार आहे. ( Politics ) या […]
असा आहे शाहरुख खान कमबॅक सिनेमा पठाण… या गोष्टीने वेधलं लक्ष