पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इंग्लंडमध्ये शिकून भारतात प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान ७५ युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अल्युमनी युनियन माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रवीण निकम (Pravin Nikam) याचाही सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त लंडन येथे हा सन्मान करण्यात आला. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यांनंतर प्रवीण सध्या […]
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने संगणकीकृत करून डिजिटल स्वाक्षरीत केला आहे. तसेच सध्या प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध होत असलेला ७/१२ आणि शहरी भागातील मिळकत पत्रिका आता आपल्याला देशातील 22 क्षेत्रीय भाषेत पाहण्यासाठी भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले, यासाठीची सुविधा राष्ट्रीय […]
मुंबई : काहीजण आयुष्यभराची कमाई हे घर घेण्यासाठी घालत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये, याकरिता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (new home ) या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का ? महारेराच्या संकेतस्थळावर […]
अभिनेत्री रसिका सुनीलने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी तिने एक इच्छा व्यक्त केली.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Governor of Maharashtra) कोण होणार, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. आज यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच नाव समोर येत आहे. […]
नवी दिल्ली : छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Chief Minister K Chandrasekhar Rao) यांची प्रगती भवन येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चेंना उधाण आलंय. या भेटीसंदर्भात संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली. पण त्यांच्या या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. राज्यात राजकीय घडामोडींना […]
मधुरव बोरु ते ब्लॉग या नाटकाचा विशेष प्रयोग नुकतच राजभवन येथे पार पडला यावेळी निर्माती , दिग्दर्शिका, अभिनेत्री म्हणून या नाटकाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम सोबत बातचीत
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. लोकांमध्ये कोयता गँगची दहशत पसरलीय हा मुद्दा अधिवेशनातही चर्चेत आला होता. यानंतर पुणे पोलिस (Pune Police) अलर्ट झाले होते. पोलिसांनी आता वेगळ्याच पद्धतीने कारवाईला सुरवात केलीय. दरम्यान पुणे पोलिसांनी कोयता गँगमधील गुंडांची धिंड काढून त्यांना धडा शिकवलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात […]
Hockey WC : हॉकी विश्वचषक २०२३ (hockey world cup 2023) चे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आज (27 जानेवारी) खेळवल जाणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा (australia ) सामना जर्मनीशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बेल्जियम आणि नेदरलँड्स आमने- सामने असतील. हे दोन्ही सामने अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या ४ संघांनी […]