नवी दिल्ली : फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर अणूहल्ल्याच्या तयारीत होता, अशी माहिती तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी दिली होती, असा दावा पॉम्पीओ यांनी आपल्या एका पुस्तकात केला आहे. पॉम्पीओ यांच्या म्हणण्यानुसार सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की हे त्यावेळी भारत देखील आक्रमक प्रत्युत्तराची तयारी करत […]
पुणे : राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि आंध्र प्रदेशमधील ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) या पक्षाबरोबर मागील निवडणुकीत युती झाली होती. मात्र, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे जाहीरपणे आम्हाला १०० जागा हव्यात असे म्हणायचे. त्यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख ओवेसी पाठींबा द्यायचे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली. अल्पकाळातच ही युती तुटल्याने सर्वच जण […]
जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्या या कंपनीने सांगितले आहे की, कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली […]
अहमदनगर येथील कॉंग्रेस आमदार लहू कानडे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
नांदेड : तेलंगणातील सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची ही तेलंगणा (Telangana) बाहेर पहिलीच सभा असणार आहे. ( Politics ) या […]
असा आहे शाहरुख खान कमबॅक सिनेमा पठाण… या गोष्टीने वेधलं लक्ष
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८१६९ अशी इतिहासातील सर्वात मोठी अशी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखन संवर्गातील तब्ब्ल ७०४३ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. परंतु, लिपिक पदासाठी पूर्व परीक्षेचा संपूर्ण महाराष्ट्रात एकच कट ऑफ लावावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज […]
पुणे : देशाचे संविधान, घटना मानायची नाही. नव्या व्यवस्थेच्या नावाखाली जुनीच पण तुम्हाला हवी असलेली मनुस्मृती आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्या कृतीतून दिसत आहे. गेल्या काही वर्षातील त्यांची वाटचाल, कृती हे आपल्याला स्पष्टपणे हेच सांगत आहे. माणसाला धर्म असतो. देशाला धर्म नसतो, असे आम्ही मानणारे लोकं आहोत. तर […]
India vs New Zealand Ruturaj Gaikwad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. (India vs New Zealand) त्याचा पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. मनगटात दुखत असल्याने ऋतुराज (Ruturaj Gaikwad) चिंतेत आहे. या कारणामुळे तो या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट (Cricket) […]
सातारा : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला. विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार […]