- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
सिक्सर किंग रोहित शर्माने झळकावले शतक, कपिल देव-सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
Rohit Sharma Record: भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला आहे. अशाप्रकारे, रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. याआधी, एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक ठोकण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देवने 72 चेंडूत शतक झळकावले होते, मात्र आता […]
-
ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीचा कोहली-राहुलला फायदा, पाहा नवीन क्रमवारी
ICC Ranking : विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली होती. आता दोन्ही खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत (ODI Ranking) फायदा झाला आहे. विराट कोहलीला आयसीसी क्रमवारीत 2 स्थानांचा फायदा झाला आहे. आता विराट कोहली नवव्या क्रमांकावर आला आहे. केएल राहुलने 15 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता केएल राहुल 15 व्या क्रमांकावर आहे. […]
-
टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’
IND vs AFG:दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (World Cup 2023) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत अफगाणिस्तानने भारताला 273 धावांचे लक्ष्य दिले आहे. अफगाणिस्तानसाठी (IND vs AFG) कर्णधार शाहिदीने 80 धावांची तर ओमरझाईने 62 धावांची खेळी केली. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी सुरुवात करता आली नाही. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर बर्थडे […]
-
Israel-Hamas: हमास कमांडरने इस्रायलवर कसा रचला हल्ल्याचा कट, वाचा सविस्तर
Israel-Hamas: गेल्या आठवड्यात हमासने केलेल्या भीषण हल्ल्याचे वर्णन इस्रायल 9/11 सारखा क्षण असे करत असेल, पण या हल्ल्यामागे ज्या व्यक्तीचं डोकं आहे, तो म्हणजे हमासचा दहशतवादी मोहम्मद दाईफ. या हल्ल्याला ‘अल अक्सा फ्लड’ असे नाव दिले आहे. शनिवारी, जेव्हा हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले, तेव्हा एक ऑडिओ टेप प्रसारित करण्यात आला ज्यामध्ये इस्रायलच्या […]
-
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ! दुबईतील गुंतवणुकीची सेबीकडून चौकशी
Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अडचणी वाढू शकतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बाजार नियामक सेबी अदानी समूह आणि गल्फ एशिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहे. हा निधी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये तयार करण्यात आला असून दुबईतील व्यापारी नासेर अली शाबान अहली यांच्या मालकीचा आहे. […]
-
World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
World Cup 2023 : सध्या भारतात ODI क्रिकेट विश्वचषक (ODI World Cup 2023) खेळला जात आहे. यातील महत्त्वाचा सामना 14 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. येथे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ल्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला अटक […]
-
‘तिच्या’ धाडसाला तोड नाही; हमासच्या 24 दहशतवाद्यांना कंठस्नान, जगभरात होतंय कौतुक
Israeli Army : गेल्या काही दिवसांत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून 1000 हून अधिक लोकांची हत्या केली होती, पण 25 वर्षीय इनबार लिबरमनला हमासच्या दहशतवाद्यांकडे उत्तर नव्हते. इनबार लिबरमनने काही लोकांसह आपल्या समुदायाला हमासच्या हल्ल्यापासून वाचवले नाही तर हमासच्या दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. एकट्या लिबरमनने यापैकी पाच जणांना ठार केले. लिबरमनची या शौर्यासाठी जगभरात […]
-
प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानीला ऑनलाईन गंडा, गुन्हा दाखल
Aftab Shivdasani Faces Cyber Fraud: बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आफताब सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. असे सांगितले जात आहे की त्याला एका खाजगी बँकेकडून एक संदेश आला होता, ज्यामध्ये त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आफताबचे मोठे नुकसान झाले आहे. आफताब शिवदासानीसोबत फसवणूक झाली आफताबला सायबर […]
-
World cup 2023: विश्वचषकात पाकिस्तानने रचला इतिहास; मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत लंकेला नमवले
World cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात हैदराबादमध्ये श्रीलंकेने दिलेले 345 धावांचे मोठे लक्ष्य पाकिस्तानने केवळ चार गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. या विश्वचषकातील पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय आहे. मोहम्मद रिझवान (नाबाद 134) आणि अब्दुल्ला शफीक (113 धावा) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेच्या तोंडातून विजय हिसकावून घेतला. […]
-
तेजस्विनी पंडितच्या ब्लू टिकवरुन रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलमाफीवरुन राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) काही सवाल केले होते. यानंतर तिची एक्स अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) […]









