Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील 1 जागांचा समावेश आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 जुलै आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 जुलै असेल. 24 जुलै रोजी मतदान […]
Congress meeting in Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि मित्रपक्षांसोबतच्या जागा वाटपावर महाराष्ट्र काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला तसेच येत्या 6 तारखेला पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा करणार आहेत. लोकसभेच्या वाटपाबाबत पावसाळी अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले म्हणाले की, […]
Sharad Pawar On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे दोन नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे […]
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) अजूनही 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्याबद्दल घाबरत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) खात्री आहे की बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ भारतात 50 षटकांचा विश्वचषक खेळेल. आयसीसीने आज 5 ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. यासोबतच काही संघांविरुद्ध चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये पाकिस्तानचे सामने आयोजित […]
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस आपापल्या परीने विजयाचे दावे करत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दोघेही यावेळी मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत, पण त्याबाबत जनतेचे मत काय आहे आणि जनतेचे मत हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि हे मत जाणून घेण्यासाठी […]
मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या एका प्रकरणात समन्स बजावले आहे. खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात दोघांविरोधात समन्स बजावण्यात आले आहे. राहुल रमेश शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आणि संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने मानहानीचा खटला विचारार्थ स्वीकारला आणि […]
ICC Men’s Cricket World Cup 2023 : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेट विश्वचषक सामन्यांची पुण्याची प्रतीक्षा तब्बल 27 वर्षांनंतर अखेर संपली आहे कारण मंगळवारी जाहीर झालेल्या विश्वचषक सामन्यांच्या वेळापत्रकात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) गहुंजे स्टेडियमचा उल्लेख होता, जिथे पाच सामने खेळले जातील. पुण्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असेल कारण एमसीए स्टेडियम त्याच्या इतिहासातील पहिला विश्वचषक सामना […]
Shivseana and BJP : भाजप अन् शिवसेना या दोन्ही पक्षातील समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यासह शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के ही नेते मंडळी उपस्थित होती. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची चर्चा झाल्याचे या […]
PM Modi Deleted His Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज भोपाळ रेल्वे स्टेशनमधून एकावेळेस ५ वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा कंदील दाखवला आहे. या कार्यक्रमविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं एक ट्वीट सोशल मीडियावरुन (Social media) डिलीट केल्याचा दावा सध्या करण्यात येत आहे. खरे तर हे कथित ट्वीट डिलीट करण्यापाठीमागे कारण […]