Horoscope Today 30 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
कोल्हापूर : कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि महादेव महाडिक, अमल महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचला आहे. श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कुस्ती लढायची असेल तर मैदानात […]
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 483 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 317 रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही महिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 483 रुग्ण पॉझिटिव्ह […]
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील बिघडलेल्या राजकीय वातावरणाचा फटका क्रिकेटला बसत आहे. आशिया चषकाबाबत (Asia Cup 2023) दोन्ही देशांमध्ये आधीच वाद सुरू आहे आणि आता 50 षटकांच्या विश्वचषकाबाबत (World Cup 2023) आलेल्या बातम्यांमुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. पाकिस्तान संघ या वर्षाच्या अखेरीस होणार्या वनडे विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही. […]
नांदेड : महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘समृद्धी’ महामार्गाचा पैसा वापरला आहे. या सर्वाचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गचे प्रमुख राधेश्याम मोपलवार हेच करत होते, असा थेट आरोप संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडणे आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी समृद्धी […]
सोलापूर : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची मैत्री राज्यात सर्वश्रुत आहे. बापट यांच्या निधनानंतर सोपल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मैत्रीची आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांची जिगरी मैत्री होती. त्यातून […]
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजारीशी झुंज देणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचं आज 73 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे आणि गिरीश बापट असे एक अनोखं नातं होतं. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त […]
नांदेड : संजय शिरसाट यांना आमदारकीच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी अडीच हजार फोन केले होते. लोकं म्हणत कशाला शिरसाटला निवडून द्यायचे, तो तिकडे मुंबईत पडलेला असतो. परंतु, मी लोकांची समजूत काढली. उद्धव ठाकरे सायंबानी सांगितले आहे. आपल्याला त्याला निवडून आणायचे आहे. म्हणून मी लोकांची समजूत काढली. पण मलाच त्याचा त्रास झाला, असे संभाजीनगरचे माजी खासदार […]
अहमदनगर : महापालिकेत (Ahmednagar Municipality) आज आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) यांनी विशेष महासभा आयोजित केली होती. या सभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे १३८७ कोटी ७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर १२४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याची कागदपत्रं मी देणार आहे. निवडणुकीच्या आधी सादर […]