केरळ : केरळ राज्याची पहिली ‘ट्रान्सजेंडर’ वकील म्हणून पद्मलक्ष्मी या बनल्या आहेत. लहानपणापासून पद्मलक्ष्मी यांनी वकील बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. राज्याचे कायदामंत्री पी. राजीव यांनी या संदर्भात सोशल मीडियावर माहिती देत पद्मलक्ष्मी यांचे अभिनंदन केले. पद्मलक्ष्मी यांनी भौतिकशास्त्र (Physics) या विषयात पदवी शिक्षण घेतल्यानंतर एल. एल. बी (LLB) साठी […]
पुणे : गुढीपाडवा (GUDI PADWA) म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीला आवर्जून बांधल्या जाणाऱ्या गाठींना या दिवशी विशेष महत्त्व असते. साखरेपासून तयार केली जाणारी ही साखरगाठी (SAKHAR GATH) गुढीला बांधण्याबरोबरच घरातील लहान मुलांच्या गळ्यात घालण्याचीही पद्धत आहे. पुण्यात (Pune) भवानी पेठ येथे गणेश डिंबळे यांच्या कारखान्यात सध्या साखर गाठ बनवण्याची लगबग […]
पुणे : गेल्या दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याला तहसीलदार मिळत नाही. मिळाला तरी चार-सहा महिन्यांत त्याची बदली केली जाते. शिरूर तालुक्यातील जनतेची शेतीशी संबंधित आणि इतर सर्वच कामे खोळंबत आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ‘कुणी तहसीलदार देता का तहसीलदार, असे म्हणत शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी आज विधानसभेत टाहो […]
मुंबई : दहिसर येथे काल भाजप कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. वारे यांच्यावर हल्ला इतका गंभीर आहे की त्यात त्यांना २१ टाके पडले आहेत. मात्र, तरीही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही. साधी घटना म्हणून नोंद करत आहेत. ही परिस्थिती भाजपवर का आली आहे, याचा कधीतरी विचार करा. […]
मुंबई : काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण तापलं आहे. डिझायनर असलेल्या अनिक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावरून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी या दोघांनाही अटक करण्यात आली […]
मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) 17 व्या साखळी सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने गुजरात जायंट्सचा (Gujrat giants vs UP Warriors) 3 गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफसाठी त्यांचे स्थान निश्चित केले. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी संघाने 39 धावांपर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांनी चौथ्या विकेटसाठी […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना आम्हाला पुन्हा लागू करावी. या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. आज विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक आहेत. त्यासाठी समिती नेमण्यात येत आहे, असे आश्वासन राज्य सरकारने […]
नवी दिल्ली : 2023 च्या कर्नाटक विधानसभा (Karnataka election) निवडणुकीतून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. यासाठी पक्ष जोरदार तयारी करत आहे. काँग्रेस निवडणुकीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. याच अनुषंगाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी येथे पहिली सभा घेतली. काँग्रेस खासदार राहुल […]
Maharashtra Politics : भाजपचे कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर काल हल्ला झाला आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यची माहिती आहे. या हल्ल्यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज विधानपरिषदेत देखील याविरोधात जोरदार आवाज उठवला. यानंतनर विधीमंडळाच्या आवारात प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे चर्चा करताना दिसले. […]
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना याप्रसंगी कर्नाटक येथील कदमवुड जाली बॉक्समधील चंदनाची बुद्ध मूर्ती भेट म्हणून दिली. तेव्हा फुमियो किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांना G-7 हिरोशिमा शिखर परिषदेचे जपान भेटीचे निमंत्रण दिले. मोदी यांनी या निमंत्रणाचा […]