रत्नागिरी : गेले अडीच वर्षे दापोलीतील (Ratnagiri) शिवसैनिक भरडला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल पण रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) संपला पाहिजे या वृत्तीला एकनाथ शिंदेंनी आळा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता. दापोलीतील शिवसैनिकांना संपवण्याचे काम दुर्दैवाने तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं, असा […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चात राजा सिंह ठाकुर यांनी आज भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, हे औरंगजेबचे अवलाद आहे. यांनी यांचा बाप पहिले सिद्ध करावा कोण आहे, हिंदू गर्जना जमा होत आहे. तेव्हा या ठिकाणीचे जनता पाहून औरंगजेबची अवलाद सुद्धा विचारात पडली असेल. जे औरंगाबादमध्ये जन्मले, ते आता मात्र छत्रपती […]
चंदीगड : खलिस्तान समर्थक वारिस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी ‘ऑपरेशन अमृतपाल’ तयार केले होते. त्यासाठी २० दिवसांपूर्वी ‘ॲक्शन प्लॅन’ ठरवण्यात आला. त्यासाठी पंजाब पोलिसांमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सलग आठ बैठका घेतल्या. तर सलग १२ दिवस यावर काम केल्यानंतर शनिवारी (दि. १८) प्रत्यक्ष ‘ऑपरेशन’ राबवित अमृतपाल सिंग याच्या मुसक्या आवळल्या आहेत. वारिस […]
विशाखापट्टणम : तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. आता त्यांनी मालिका 1 -1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि […]
अहमदनगर : वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद केले. त्या ठिकाणची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. केवळ एक हजार रुपयात जनतेला घरपोच वाळू देणार आहे, अशी घोषणा मी उद्या विधानसभेत करणार आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे. वर्षभरात या भागातील जनतेला साकळाई […]
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत सलग दोन दिवस विमानातून एकत्र प्रवासामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (दि. १७) रोजी पहिल्यांदा गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी एकत्र विमान प्रवास केला होता. तर रविवारी (दि.१८) रोजी दुसऱ्यांदा नांदेड ते मुंबई असा महाजन-भुजबळ एकत्र प्रवास करण्याची शक्यता […]
मुंबई : शिवाजी पार्कमध्ये ‘जाणता राजा’चा (Janata Raja mahanatya) प्रयोग झाला. यावेळी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) मावळ्याच्या रुपात दिसून आला. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सहाव्या दिवशी सचिन तेंडूलकरने हजेरी लावली होती. यावेळी भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सचिनचे स्वागत केले. व्यासपीठावर सचिन असल्याने चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘शाळेत इतिहासाची सुरुवात […]
आज विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर […]
पुणे : देशात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार आहे. मात्र, दोन्हीही सरकारच्या योजना या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही सरकार केवळ राजकारण करण्याच व्यस्त असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या आतमध्ये काय सुरु आहे याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळलेल. […]
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे आवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु, सरकारच्या वतीने गांभीर्याने पंचनामे केले जात नाही. त्यासाठी संपाचे कारण दिले जात आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुग्रह अनुदान मिळायला हवे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत कसलेही गांभीर्य नाही. आम्ही त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यात […]