मुंबई : उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुलजी गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण राहुल जी गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज […]
Bageshwar Dham Sarkar: वेगवेगळ्या व्यक्तव्यामुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार ( Bageshwar Dham Sarkar) हे सध्या मुंबईत आहेत. मीरा रोड येथे शनिवारी रात्री त्यांच्या दिव्य दरबार भरला होता. या दिव्य दरबारमध्ये चोरट्यांनी डाव साधला आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक महिलांचे सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. विशेष म्हणजे […]
मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई संघाचा सलग पाच विजयानंतर अखेर पराभव झाला आहे. मुंबईचा विजयी रथ यूपी वॉरियर्सने (UP Warriors) रोखला आहे. या लीगच्या 15व्या सामन्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबईचा सामना यूपीशी झाला. या सामन्यात यूपी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर […]
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (International Criminal Court) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि रशियाचे बाल हक्क आयुक्त यांच्यासाठी अटक वॉरंट जारी करण्याच्या निर्णयानंतर रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने शनिवारी एक निवेदन जारी करून म्हटले की, शुक्रवारी रात्री रशियाने 16 रशियन ड्रोनसह युक्रेनवर हल्ला केला. एका टेलीग्राममध्ये, हवाई दलाच्या […]
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 240 जागांवर निवडणूक लढविणार असून शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य पक्षाच्या प्रभारींसमोर बोलताना केल्याने आता त्यावर वेगळेच वाद सुरू झाले आहेत. त्यांनी हे विधान नंतर मागे घेतले असले तरी व्हायचा तो घोळ झाला आहे. भाजपच्या मनात काय सुरू आहे, […]
(अशोक देशमुख : टीम लेट्सअप) नाशिक : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राज्यभर चाहते आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक केला. समाजात मुंडे यांचे स्थान नेहमीच श्रद्धेचे राहिले आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका गावात मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
विशाखापट्टणम: पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता दुसऱ्या वनडेसाठीही सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 19 मार्च, रविवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. संघ बदलण्याची शक्यता आहे या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात […]
मुबई : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मार्च – एप्रिल 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आता काल परवा राज्यातील महाविकास आघाडीने 2024 जागा वाटपाचा फार्मुला ठरवला आहे. त्यामध्ये ठाकरे गट सर्वाधिक 21 लिकसभेच्या निवडणुका लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 19 […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादात सापडलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांचा मुंबईत एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) विरोध केला आहे. त्यांच्या या कार्यक्रमाविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेश्वर […]
नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या भाषणात मिश्किल टोला लागवला. त्यानंतर मंचावर उपस्थित […]